ताज्याघडामोडी

….कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हरवलेली उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा अशी उपहासात्मक मागणी केली होती.या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकर हे नवीन गवत आहे अशी टीका केली होती.त्यानंतर आता आमदार पडळकर यांनी विजय वड्डेटीवार यांना खुमासदार शैलीत पत्र लिहले आहे.   

काय आहे आमदार पडळकरांच्या पत्रात 

 

मी मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्कफोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर ‘निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे. किंबहुना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते

किंबहुना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते.
किंबहूना मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते.

किंबहुना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने त्यांच्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता. किंबहुना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधूल दारूबंदी उठवता आली नसती.

किंबहुना दारूबंदीनंतर २३ लिकर शॉप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरीत करता आले नसते. किंबहूना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल..

मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते, असं प्रत्त्युत्तर पडळकरांनी वडेट्टीवारांना दिलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *