ताज्याघडामोडी

काल रात्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक ,आज आदेश निघाला -शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे

अकलूज हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिदू राहिलेले शहर.या शहराच्या सर्वागीण विकासासाठी अकलूज-माळेवाडी साठी अकलूज नगर पालिकेची स्थापना करण्यात यावी ,या नातेपुते नगर पंचायत स्थापन स्थापन करण्यात यावी यासाठी गेल्या जवळपास ४३ दिवसापासून अकलूजकरांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.मात्र या बाबत शासनस्तरावर निर्णय होत नसल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अकलूज हि स्वतंत्र नगर पालिका म्हणून गणली जाईल यासाठी योग्य ते आदेश काढले आहेत.आणि हे आदेश काढण्यापूर्वी काल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांच्यासह सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,धनंजय डिकोळे,पुरुषोत्त्तम बरडे,गणेश वानकर,उपजिल्हा प्रमुख दत्ता पवार,माळशिरस तालुका प्रमुख नामदेव वाघमारे,युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील वाघमारे यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक घेऊन अकलूज नगर पालिका न निर्मिती बाबत चर्चा केली आणि आज या बाबतचे आदेश काढले आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे आणि धनंजय डिकोळे यांनी दिली आहे.             

या बाबत अधिक माहिती देताना शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे यांनी अकलूज  नगर पालिका निर्मितीबाबत सुरु असलेल्या घडामोडी बाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगत हा निर्णय घेणे कसे गरजेचे आहे यासाठी शिवसेनेच्या शिस्टमंडळाने एक निवेदन नामदार एकनाथ शिंदे यांना दिल्याचे सांगत अकलूज आणि नातेपुते येथील जनतेच्या भावना या निवेदनातून व्यक्त होत असल्याने या बाबत तातडीने निर्णय होणे कसे गरजेचे आहे हे पटवून देण्यात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळास यश आले आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पुन्हा बोलावून घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेचे फलित म्हणून नगर विकास विभागाने अकलूज नगर पालिका निर्मितीस मान्यता दिली असल्याचे सांगत या निर्णयाची प्रत सोलापुरचे जिल्हाधिकारी यांना पाठवीत असल्याचे सांगितले.अकलूज आणि नातेपुते येथील जनभावनेचा आदर राज्य सरकारने नगर पालिका निर्मितीचा आदेश दिल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे. तर हा आदेश निघाल्याचे समजताच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील व अकलूजचे माजी सरपंच धैर्यशिल मोहिते पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले अशी माहिती यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा कुलकर्णी व माळशिरस तालुका प्रमुख नामदेव नाना वाघमारे यांनी दिली.

अकलूज नगरपालिका निर्मितीसाठी चे सर्व अडथळे पार पाडत राज्यातील महा विकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे, या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आम्ही आभार मानतो अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता पवार यांनी या निर्णयानंतर बोलताना व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *