गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गरीब विद्यार्थाना नामवंत शाळेत आरटीई खाली प्रवेश देण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी

गरीब घरातील मुलांना परिसरातील नामवंत खाजगी शाळेत प्रवेश घेता यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आरटीई कायदा २०१२ मध्ये आणला खरा पण अनेक वेळा अशा बड्या संस्थाचालकांच्या नामवंत शाळेत प्रवेश घेण्यासाठी आरटीई अंतर्गत पात्र ठरणाऱ्या गरीब कुटूंबातील विद्यार्थाना प्रवेश नाकारण्यासाठी मोठ्या हिकमती अनेक संस्थाचालक वापरताना दिसून येतात.सध्या हि भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असली तरी अनेक धनाड्य पालक आपले उत्पन्न  विहित मर्यादेपेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला मिळविण्यात गैरमार्गाचा वापर करत यशस्वी होतात आणि आरटीई प्रवेश प्रक्रिया हि केवळ गरीब विद्यार्थांसाठी असताना पद्धतीशीरपणे यात घुसखोरी करतात.आणि प्रसंगी लाच देऊन देखील प्रवेश मिळविण्यात यशस्वी होतात.मात्र कधी कधी लाच मागणाराचा अंदाज चुकतो आणि एखादा पालक थेट लाचलुचपत विभागाच्या कारवाईस सामोरे जावे लागते असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात घडला असून या प्रकरणी लाच लुचपत विभागाने कारवाई करत  रामदास शिवनाथ वालझाडे. (गट शिक्षण अधिकारी) आणि विकास नंदकुमार धुमाळ,( वय पंचायत समिती हवेली) याना रंगेहाथ पकडले आहे.    

            

शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलीला मिळालेल्या प्रवेशाला कागदपत्रे तपासून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना हवेली पंचायत समितीतील एकासह गटशिक्षणाधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.रामदास शिवनाथ वालझाडे. (वय 50 पद-गट शिक्षण अधिकारी) आणि विकास नंदकुमार धुमाळ,( वय -4O पंचायत समिती हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या मुलीचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आर टी इ) अन्वये हडपसर येथे एका शाळेत लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादीत नाव समाविष्ट करायचे होते. त्याकरीता कागदपत्रे तपासून प्रवेशासाठी ऑनलाईन मान्यता देण्यासाठी यातील आरोपी विकास धुमाळ यांनी आरोपी गटशिक्षणाधिकारी वालझोडे यांच्यासाठी 50 हजारांची लाचेची मागणी करून रक्कम स्विकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *