गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोलापूर अन्न प्रशासनाकडून २२३० किलो चहा पावडर जप्त

दिनांक ३१/०८/२०२१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील राहुती (कोंडी), ता. उत्तर सोलापूर येथे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर यांनी मे. के. जी. टी कंपनी, गट क्र. १५५, स. नं. ५५/२, प्लॉट क्र. ६, मु. राहुती, पो. कोंडी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर या पेढीची तपासणी केली असता तपासणीवेळी चहा पावडर मध्ये रंग वापरात असल्याचे आढळून आले. सदर चहा पावडर चे ५ अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा २२३० किलो, किं. रु. २४००४०/- चा साठा जप्त करुन सदर पेढीकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

 

वरील अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आलेले आहे. अन्न विश्लेषकांकडून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमने 2011 नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *