तेलंगाणामधील मेडक जिल्ह्यात भाजप नेत्याला कारमध्ये कोंडून जिवंत जाळल्याची घटना समोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी मेडक जिल्ह्यातील स्थानिक भाजपाच्या नेत्याला कारच्या डिक्कीत कोंडून जिवंत जाळले. या घटनेत भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी स्थानक पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान या घटनेबाबत मेडकच्या एसपी चंदना दिप्ती यांनी सांगितले,’या घटनेत काही लोकांनी कारच्या डिक्कीत भाजपा नेत्याला कोंडून कारला जाळले जेव्हा पोलिसांची टीम घटना स्थळी पोहचली त्यावेळी त्या कारच्या डिक्कीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे.ते पुढे म्हणाले, या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.’