ताज्याघडामोडी

खुनाच्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक १०/०५/२०२० रोजी गुन्हा रजि.नं.४९७/२०२० भा.द.वि. ३०२ नुसार दाखल गुन्ह्यात १९/०६/ २०२० रोजी आरोपी अंकुश लक्ष्मण पवार यास अटक केली होती.२७/०६/२०२० पासून सदर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. 

  सदर प्रकरणातील आरोपी अंकुश लक्ष्मण पवार याने ऍडव्होकेट पांडुरंग वा. चवरे यांच्या मार्फत मे.जिल्हा न्यायाधिश १ यांच्यासमोर जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता.होता सदर प्रकरणी ऍडव्होकेट पांडुरंग वा. चवरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे.जिल्हा न्यायाधीश सी.एस.बाविस्कर यांनी आरोपीस जामीन मंजूर केला आहे.आरोपीच्या वतीने ऍड .पांडुरंग चवरे,ऍड  .वाघेला,ऍड.कुंडलिक बंदपट्टे,ऍड.गौरी कुलकर्णी यांनी काम पाहिले   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *