ताज्याघडामोडी

प्रणव परिचारक,संतोष कवडे,शशिकांत पाटीलसह अनेक आंदोलकांवर गुन्हा दाखल

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूरसह ५ तालुक्यात १३ ऑगस्ट पासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.पंढरपुर शहरात आढळून येणारी कोरोना बाधितांची संख्या अत्यल्प असताना पंढरपूर शहरावर संचारबंदी लादणे अन्यायकारक आहे अशी भावना दुकानदार,व्यापारी,छोटे व्यसायीक व्यक्त लागले आणि या संचारबंदी आदेशा विरोधात काल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घंटानाद आंदोलन कऱण्यात आले होते.या प्रकरणी प्रणव परिचारक,संतोष कवडे,शशिकांत पाटील यांच्यासह जवळपास २५ ते तीस आंदोलकांवर मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधीकारी सोलापूर यांचा आदेश जा. क्र.2021डि. शी. बी/02आर.आर.आर/3564 दि.24/07/2021 अन्वये आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणुन भादवि क.188,269,34प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पो.ना. अभिमन्यु अंबादास गरड यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सत्यविजय मोहोळकर,दिलीप धोञे ,शशिकांत पाटील, संतोष कवडे ,सोमनाथ आवताडे ,प्रणव परिचारक ,आप्पा मुचलंबे ,विनोद लटके,शेखर भोसले यांच्यासह इतर दहा ते पंधरा इसम हे सदर ठिकाणी अंदोलनास कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना आंदोलन करताना आढळून आल्याने सदर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *