ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक 11 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार दिनांक 03 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश आण्णासो भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर(अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष),संजय चरणु पाटील (अपक्ष),अमोल अभिमन्यु माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे(अपक्ष), रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे 19 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.
मतदान शनिवार दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी रविवार दिनांक 02 मे 2021 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *