गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्यापाऱ्याला मारली गोळी, शीर धडापासून वेगळे करुन ते हातात घेऊन फिरत राहिला

एका भाजपा कार्यकर्त्याने केले कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. उ. प्रदेशात आगरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आरोपी भाजप कार्यकर्त्याने आपल्या मित्राला पहिल्यांदा गोळी मारली. त्यानंतर त्याचे शीर त्याने धडापासून वेगळे केले. धड फेकून दिले आणि त्याचे शिर सोबत घेऊन ते नाहीसे करण्यासाठी, तो कारमधून शहरात फिरत राहिला. याच वेळी त्याला पोलिसांनी अटक केली. या निर्घृण हत्याकांडात त्याचा एक साथीदारही सहभागी होता. पोलिसांनी आता हत्येच्या आरोपात या दोघांनाही अटक केली आहे. या हत्येमागचे कारण काय आहे, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. हत्या करणारा आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही भाजपाचे कार्यकर्ते होते, असे सांगण्यात येते आहे.

पहाटे उघडकीस आला प्रकार

घटना आगराजवळील अरसेना गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांना जंगलात एक कार उभी असलेली दिसली. एक तरुण या कारच्या बाहेर उभा होता. जेव्हा पोलीस त्या कारच्या जवळ पोहचले तेव्हा त्यांना केवळ एका मृतदेहाचे धड पडलेले दिसले. गाडीत पुढच्या सीटवर एक दुसरा तरुणही बसलेला होता. जेव्हा पोलिसांनी कारच्या मागच्या बाजूला डोकावले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

गाडीत मागच्या सीटवर मृतदेहाचे शीर ठेवलेले होते. पोलिसांनी तातडीने या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत समजले की मृत व्यक्तीचे नाव हे नितीन वर्मा आहे आणि तो चांदीचा व्यापारी होता. नितीन यांचे बंधू प्रवीण आणि अन्य कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. गुरुवारी संध्याकाळी नितीन वर्मा हे बेलनगंजमध्ये राहणाऱ्या टिंकू भार्गवला भेटण्यासाठी गेले होते, तिथून ते परतलेच नाही.

अनुसूचित मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आरोपी

चांदी व्यापारी नितीन वर्मा यांचे घराच्या बाहेरच्या भागातच चांदीचे दुकान होते. वर्मा हे भाजपाच्या गोपेश्वर मंडळाचे उपाध्यक्षही होते. गुरुवारी संध्याकाळी फोन आला तेव्हा ते टिंकूसोबत असल्याची माहिती त्यांनी पत्नीला दिली होती. थोड्याच वेळात घरी परतणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. रात्री उशिरा जेव्हा नितीन यांना फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन स्वीच ऑफ येत होता. टिंकूचा फोनही बंद येत होता. टिंकू भाजपाच्या अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती आहे.

पहिल्यांदा गोळी मारली मग शीर कापले

या हत्याकांडात टिंकू भार्गव आणि त्याचा साथीदार अनिल याला अटक करण्यात आलेली आहे. या दोघांनी पहिल्यांदा नितीन वर्मासोबत दारु प्यायली. त्यानंतर त्याची गोळी मारुन हत्या केली. त्यानंतर दोघांनी धारदार हत्याराने नितीन वर्मा यांचे शीर कापले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते प्रय़त्न करीत होते. टिंकू याने ओळखीच्या माणसाची कार त्यासाठी आणली होती. गाडीची नंबर प्लेटही बदलण्यात आली होती. सीसीटीव्हीत गाडी ओळखू येऊ नये यासठी नंबरप्लेट बदलण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *