Uncategorized

माझ्या घरातील सीसीटीव्ही फ़ुटेज मध्ये आहे,पंढरपुर शहर पोलिसांच्या वसूलदाराने पाच लाख नेले

जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली तक्रार

 

भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष विदुला अधटराव याच्यावर बेकायदा सावकारीचा आरोप करीत पंढरपुर शहर पोलिसांनी काही दिवसापूर्वी कारवाई केली होती.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मिटू जगदाळे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांच्या बरोबरच सह.निबंधक सहकारी संस्था पंढऱपुर यांच्या कार्यालयातील काही कर्मचारीही सहभागी झाले होते.या कारवाईत विदुल अधटराव याच्या घरातून पोलिसांनी काही चेक व हिशोबाच्या वह्या जप्त केल्या होत्या.मात्र प्रत्यक्ष गुन्हा नोंद करताना रुपये ३० हजार इतकी किरकोळ रक्कम ताब्यात घेतल्यात आल्याचे नमूद करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या कारवाईत लाखो रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत अशी सुरस चर्चाही पंढपुरात रंगली होती.या प्रकरणी विदुल अधटराव यास अटक झाली आणि हे प्रकरण थंड बस्त्यात गेले.
        गेल्या काही दिवसात पंढरपुर पोलीस विभागातील शहर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचारी हे वादग्रस्त ठरले असल्याचे दिसून आले.गतवर्षी वाळू चोरांशी संबंध असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची रवानगी थेट जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्यात आली तर पोलिसांच्या ताब्यात टिपर बेकायदेशीर रित्या सोडल्याच्या ठपका असल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले होते अशीही चर्चा झाली. .याचीच पुढची आवृत्ती म्हणून कदाचित पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहा.पोलीस निरीक्षक गाडेकर यांच्यासह काही जणांवर मागील महिन्यात लाचलुचपत विभागाने कारवाई करत अटक केली होती.तर काल सरकोली तालुका पंढरपुर येथील वाळू तस्कराने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या भावाने थेट तालुका पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नावाचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते व काही पोलीस कर्मचारी हे माझ्या भावास वाळू चोरीसाठी प्रोत्साहन देत होते,ढाब्यावर पार्ट्या खात होते,हप्ते घेत होते असा आरोप केल्याने साऱ्या जिल्ह्यात खळबळ उडाली होती.आता बेकायदा सावकारी प्रकरणी कारवाई झालेल्या विदुला अधटराव याने थेट एसपी कडे तक्रार करीत आपल्या घरी पोलीस कारवाई साठी आले होते त्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पोलीस खात्यात नसलेला एक व्यक्ती पोलिसांसोबत आला होता व ५ लाख ३० हजार इतकी रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली मात्र कागदोपत्री फक्त तीस हजार रुपयेच दाखविले,उर्वरित ५ लाख रुपये सदर व्यक्तीने नेले, हे दिसून येईल असा दावा त्याने केला असून मात्र तो डीव्हीआर पोलीस उपनिरीक्षक मिटू जगदाळे हे घेऊन गेले असा खबळजनक आरोप केला आहे.
अर्थात सावकारी प्रकरणात अटक झालेल्या व जमिनीवर सुटलेल्या आरोपीची तक्रार म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते या विदुल अधटराव याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार कि या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा,पोलीस खात्यावर लावण्यात आलेले लांछन दूर व्हावे म्हणून इतर तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि सायबर क्राईमच्या माध्यमातून तपास करण्याचे आदेश देणार या बाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व आंतरराज्य प्रवासास प्रतिबंध लागू केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात कर्नाटकातून नातेवाईकाच्या अंत्यविधीस चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तीकडून आठ हजार रुपये घेऊन केवळ पाचशे रुपयाची पावती देण्यात आल्याच्या प्रकरणी जशी सखोल तपास करून कारवाई केली तशीच कारवाई सत्य उजेडात आणून पोलीस खात्याची प्रतिमा मालिन होऊ नये यासाठी या प्रकरणी केली जाणार हे आता येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. 
     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *