ताज्याघडामोडी

कर्नाटक निवडणूक; टाइम्स नाउचा एक्झिट पोल, भाजपला धक्का, काँग्रेसची सत्ता येणार!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झालं. विधानसभेच्या संपूर्ण २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा १३ मे रोजी म्हणजे येत्या शनिवारी लागणार आहे. पण त्यापूर्वी वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सचे आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. टाइम्स नाउच्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाइम्स नाउ नवभारत टाइम्सचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. टाइम्स नाउ नवभारत टाइम्सचे एक्झिट पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला आहे. निवडणुकीत काँग्रेस १०६ ते १२० जागा जिंकेल, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला आहे. कर्नाटक सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ इतका आहे. तसंच मतांच्या टक्केवारीतही काँग्रेस भाजपला मागे टाकेल, असं अंदाज आहे.

भाजप – ७८ ते ९२

काँग्रेस – १०६ ते १२०

जेडीएस – २० ते २६

इतर – २ ते ४

कुठल्या पक्षाला किती टक्के मतं?

भाजप – ३६.७० टक्के

काँग्रेस – ४०.९० टक्के

जेडीएस – १६.१० टक्के

इतर – ६.३० टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *