Uncategorized

निर्बीजीकरणासाठी नगर पालिकेची १० लाख खर्च करण्याची तयारी

पंढरपूर शहरातील रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वावरताना जागोजागी मोकाट गाईगुरांचे कळप आणि भटक्या कुत्र्यांचे टोळके हि नित्याची बाब ठरली आहे.पंढरपूर शहरातील अनेक गर्दीचे प्रमुख रस्ते,चौक आदी ठिकाणी जसे गुरांचे कळप हक्काने ठिय्या मांडून बसलेले दिसतात तसेच भटक्या  कुत्र्यांचे कळपही हिंडताना दिसून येतात.याचा नागिरकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने नगर पालिकेकडून वेळोवेळी मोकाट जनावरे पकडण्यासाठी व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित असलेल्या निविदा काढते.मात्र ना मोकाट जनावरांचा नागिरकांना होणारा त्रास कमी होतो ना भटक्या कुत्र्यांचा वावर कमी होतो.रात्रीच्या वेळी तर पायी अथवा दुचाकीवरून जाणाऱ्या नागिरकांना या भटक्या कुत्र्यांच्या पाठलागाचा थरार अनुभवास येतो आणि अनेकांना धूम स्टाइलने दुचाकी पळवावी लागताना दिसून येते.

आता पंढरपूरकरांची भटक्या कुत्र्यांपासून सुटका करण्यासाठी पंढरपूर नगर पालिकेने १० लाख रुपये खर्चाची तयारी दर्शविली असून यासाठी नेहमी प्रमाणे निविदाही आमंत्रित केल्या  आलेल्या आहेत.हि निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतरच लवकरच ठेकेदार नियुक्त होईल आणि शहरातील भटक्या कुत्र्यांचा वावर कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *