Uncategorized

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात ‘इतिहासाची’ चौथ्यांदा पुनरावृत्ती ? 
राजकरणाच्या साठमारीत ‘विठ्ठल वाचला पाहिजे’ हीच जुन्या जाणत्या सभासदांची अपेक्षा
सिन क्रमांक १ – 

१९९१ मध्ये कॉग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यावेळी कॉग्रेसमध्येच असलेले स्वर्गीय कर्मवीर औदूंबरअण्णा पाटील आणि स्वर्गीय कर्मयोगी सुधारकपंत परिचारक यांच्यात जोरदार रस्सीखेच होती.अण्णांना शरद पवार यांनी उस्मानाबाद येथे बोलावून घेतले आणि कारखान्याकडे भरपूर पैसे शिल्लक आहेत.४ कोटी पक्ष निधी द्या तुम्हाला उमेदवारी देतो अशी अट घातली.पण विधानसभेच्या उमेदवारी पेक्षा स्वर्गीय कर्मवीर अण्णांनी माझ्या विठ्ठल कारखान्याचे हित मला जास्त महत्वाचे आहे असे सांगत शरद पवार यांची ऑफर धुडकावली.पुढे भीमा कारखान्याचे प्रशासक असलेल्या स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांना शरद पवार यांनी कॉग्रेसकडून उमेवारी दिली.विठ्ठल परिवार प्रचंड संतप्त झाला.हेच फळ का अण्णांच्या निष्ठेला असा सवाल विचारला जाऊ लागला.पण स्वर्गीय कर्मवीर अण्णांनी सर्वाना शांत केले आणि पारंपरिक विरोधक असलेल्या परिचारक गटास पाठबळ देत,माझ्या विठ्ठल कारखान्याचे ४ कोटी वाचले याचे समाधान मानत स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या उमेदवारीस नुसता पाठींबा देऊन थांबले नाहीत तर ७९ हजार मतांचे विक्रमी मताधिक्य देण्यात प्रभावी भूमिका बजावली. 

     सिन क्रमांक २ – 
  २००९ मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे एकहाती वर्चस्व होते.१९८८ च्या शरद पवार यांचा बंडात याच कारखान्याचे संस्थापक आमदार स्वर्गीय औदुंबरआण्णा पाटील हे विधानसभेत शरद पवार यांना पाठिम्बा देणारे पहिले आमदार होते.आणि कर्मवीर अण्णांच्या या निर्णयाची पाठराखण विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी म्हणजेच तत्कालीन आण्णा गटाने केली होती.तर शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पुलोद आघाडी मधून याच विठ्ठल कारखान्याचे व्हाईस चेअरमन स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील यांनी उमेदवारी घेत १९८५ च्या निवडणुकीत परिचारक यांच्या विरोधात निवडणूक लढविली.त्यात ते पराभतू झाले.पुढे शरद पवार यांनी १९९१ आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल कारखान्याशी संबंधित आपल्या पारंपरिक कट्टर समर्थकांना विचारात घेतले नाही याची आठवण ठेवत स्वर्गीय भारतनाना भालके यांनी शरद पवार यांनी दिलेल्या विजयसिह मोहिते पाटील या बलाढ्य उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढली.त्या निवडणुकीत शरद पवार यांनी केलेली भाषणे विठ्ठल परिवारातील जुने जाणते सभासद अजूनही विसरले नाहीत.परंतु याच निवडणुकीत स्वर्गीय भारतनाना विजयी झाले आणि कॉग्रेसकडून थेट विमान पाठविण्यात आले.रिडालोस कडून लढलेले स्वर्गीय भारतनाना त्याच विमानात बसून मुंबईस गेले आणि कॉग्रेसला पाठिबा जाहीर केला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसला नाही.कॉगेसला दिलेला हा पाठिबा हि शरद पवार यांना एक प्रकारे धक्का दिला होता असे मानले जाते. 
    सिन क्रमांक ४ – 
   स्थापने पासून विठ्ठलचा गळीत हंगाम दोन वेळा बंद ठेवला गेला.विठ्ठल कारखाना कर्जाच्या वसुलीच्या चक्रात अडकला,कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली आणि तिरंगी लढतीत तिसऱ्या नवख्या नेतुत्वाच्या हाती कारखाना चालविणारा माणूस या नॅरेटिव्ह वर विश्वास ठेवत सभासदांनी कारखाना सोपवला.आता दसऱ्याचे धुणे काढल्या प्रमाणे मागील चिंद्याचे गाठोडे आणि चालू धुणे याची जबाबदारी घेतलेले चेअरमन अभिजित पाटील हे न मागता विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या शरद पवार यांना धक्का देत भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.५ मे २०२३ चा तो पक्ष प्रवेश बळजबरीने घडवून आणला गेला या झालेल्या चर्चेस मौन बाळगत अ प्रत्यक्ष दुजोरा देत आहेत असेच सध्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असलेला विठ्ठल परिवार आहे असे म्हटले जात आले आहे पण याच कारखान्याचे चेअरमन स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी ९९ मध्ये शिवसेनेकडून आणि २००४ मध्ये चेअरमन स्वर्गीय भारतनाना भालके यांनी २००४ मध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटले होते.त्याकाळी त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात घेतलेली भूमिका हि विठ्ठल परिवार आणि विठ्ठल कारखाना यांचे हित लक्षात घेत स्वीकारली गेली होती असेही म्हटले जाते. 
        मग आता थकीत  कर्ज वसुलीचा बडगा उगारत अवसायनात निघणाऱ्या विठ्ठल परिवाराची अस्मिता असलेल्या विठल करखान्यास वाचविण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांना दोन दिवसात भूमिका बदलावी लागते,ज्या शरद पवार यांनी न मागता ऍडव्हान्स मध्ये विधानसभेची उमेदवारी जाहीर केली त्यांच्या पक्षाविरोधात काम करण्याची भूमिका विधानसभेची उमेदवारी नाकारत घ्यावी लागत आहे.आणि चेअरमन अभिजित पाटील यांची विठ्ठल कारखान्यावरील कारवाई टाळण्यासाठी घेतलेली हीच ‘शरद पवार’ विरोधी भूमिका ‘पूर्व इतिहास’ लक्षात घेत स्वीकारणार का ? हेच आता पाहावे लागेल.तर विठ्ठल टिकला पाहिजे,अवसानयात निघाला नाही पाहिजे अशी भूमिका असलेले विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सर्मथक आबा निर्णय घेतील तो मान्य अशीच प्रतिक्रया व्यक्त करू लागले आहेत.     
                 – राजकुमार शहापूरकर 
(संपादक -पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *