ताज्याघडामोडी

केवळ एक SMS करेल तुमचं खातं रिकामं, बँकेने ग्राहकांना दिला सावधान राहण्याचा इशारा

नवी दिल्ली, 06 जुलै: तुमचे जर खाते देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची एक चूक तुमचं बँक खातं रिकामं करण्यास कारणीभूत ठरू शकते. बँकेने ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. SBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. बँक खात्यातून Unauthorized transactions वाढत असल्याने बँकेने ही महत्त्वाची माहिती ग्राहकांबरोबर शेअर केली आहे.

एसबीआयच्या ग्राहकांना येणाऱ्या बनावट मेसेज संदर्भात बँकेने हे ट्वीट केलं आहे.एका ग्राहकाच्या तक्रारीवर उत्तर देताना एसबीआयच्या अधिकृत अकाउंटवरून हे ट्वीट करण्यात आसं आहे. या बनावट मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ग्राहकाने @TheOfficialSBI आणि @Cybercellindia ला टॅग केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून याबाबत माहिती मिळवण्याकरता या ग्राहकाने ट्वीट केलं आहे. ग्राहकाला त्याचं एसबीआय खात 24 तासात ब्लॉक होईल असा मेसेज आला होता आणि ते टाळण्यासाठी एका क्रमांकावर त्वरित कॉल करण्याचं त्या मेसेजमधून नमुद करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *