माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कारवाईची शिफारस
पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात नियमबाह्य बाँडरायटर तसेच या ठिकाणी देण्यात आलेले वीज कनेक्शन बाबत माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती प्राप्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर जनमाहिती अधिकारी पंढरपूर तहसील कार्यालय यांनी माहिती दिली नाही तसेच या बाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे माहिती अधिकार कायदा कलम १९ नुसार अपील दाखल करूनही अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी घेतली नाही या करणास्तव राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठ यांच्याकडे माहिती अधिकार कायदा २००५ कलम १९(३) नुसार अपील कऱण्यात आले होते.
या बाबत राज्य माहिती आयुक्त पुणे यांच्यासमोर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने राज्य माहिती आयोग यांनी आदेश दिले असून या प्रकरणी कोणतीही पूर्व सूचना न देता अथवा पूर्व परवानगी न घेता,तत्कालीन व विद्यमान जन माहिती अधिकारी व तत्कालीन व विद्यमान अपिलीय अधिकारी हे राज्य माहिती आयोगासमोरील सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या विरोधात शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग,२०१५,प्र.क्र.२२२/१५ नुसार कारवाई करण्यात यावी असे आदेश पारित केले आहेत.या आदेशाची प्रति जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आल्या आहेत.
A TATA Product
टायटन घड्याळामधील अग्रगण्य कंपनी
डाटा प्रायव्हसी प्रोटेक्शन
संपूर्ण माहितीसाठी तज्ञ स्टाफ
सर्व्हिस सेंटर शोरूममध्येच
बेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू फक्त आम्हीच देतो*
आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995