Uncategorized

अखेर अँपेक्स केअर हॉस्पिटलच्या संचालकास सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून अटक 

आमदार गोपीचंद पडळकर यांची आक्रमक भूमिका ठरली निर्णायक

सांगली मिरज येथील अँपेक्स केअर या हॉस्पिटल मध्ये २७ एप्रिल रोजी पंढरपूर शहरातील एका कोरोना बाधित वयोवृद्ध महिलेस पंढरपुरात बेड न मिळाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.२० एप्रिल रोजी सदर महिलेचा मृत्यू झाला.या चार दिवसाच्या उपचारापोटी अडीच लाख रुपयांचे बिल मागत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यास या हॉस्पिटल चालकाने नकार दिला व नातेवाईकास बिलापोटी धमकावण्यात आल्याची तक्रार मयताच्या नातवाची होती.१४ तास वाट पाहिल्यानंतर सदर मयताच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला होता  व अडीच लाख बिल कसे झाले याचा जाब विचारत असल्यामुळे तणाव वाढत गेला होता.यातूनच मोठी वादावादी झाली होती.या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जिल्हाधिकऱ्याकडे तक्रार केल्यानंतर कारवाई झाली होती.सांगली जिल्ह्यातील मिरजेतील अॅपेक्स केअर रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव याला अटक करण्यात आली आहे. रुग्णांची हेळसांड करून तब्बल 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका डॉ. महेश जाधव याच्यावर आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग जाधवला रात्री पकडले. आता अपेक्स हॉस्पिटल रुग्णालयातील 87 रुग्णाच्या डेथ ऑडिटची पोलिसांना प्रतीक्षा आहे.पंढरपुरातील रुग्णाच्या नातेवाईकास हॉस्पिटल चालकाने बाउन्सर द्वारे धमकी दिली अशी तक्रार असताना उलट त्याच्या विरोधातच हॉस्पिटलमध्ये तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.हि गंभीर बाब आमदार गोपीचंद पडळकर याना रुग्णाच्या नातेवाईकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकरणी आ.पडळकर आणि आ. सदभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेत चौकशीची मागणी केली होती.           

व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू करून या हॉस्पिटलमध्ये तज्ञ वैद्यकीय पथक ऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला याशिवाय भरमसाट बिलांची आकारणी करून पावत्या देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.पुढील चौकशीसाठी डॉ. जाधव याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डॉ. जाधव याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. 

डॉ. जाधव याने मिरज-सांगली रस्त्यावर अॅपेक्स कोरोना हॉस्पिटल सुरू केले होते. हॉस्पिटलमध्ये पुरेशी यंत्रसामग्री नसतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 205 रुग्णांना दाखल करून घेतले होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉ. जाधव याने भरमसाट बिलांची आकारणी केली, तसेच डिस्जार्च झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाची पावती देण्यास देखील टाळाटाळ करण्यात येत होती. आवश्यकता नसतानाही अनेकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन देखील मागविण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या होत्या.याशिवाय कोरोना उपचारादरम्यान हॉस्पिटलमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद ठेवण्यात आले होते . यामुळे या हॉस्पिटल मधील कारभारावर अधिकच संशय बळावला होता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *