Uncategorized

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी   

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती देशविदेशात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.याही वर्षी दि. 14/5/2026 रोजी पंढरपूर शहर तालुक्यात शिवभक्तांकडून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.तर जयंती निमित्त पंढरपुर शहर  तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जयंती उत्साहात, वैचारिक पातळीवर आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून साजरी करण्यात यावी यासाठी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रांताधिकारी पंढरपूर यांना निवेदन देत करण्यात आली. 
यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष — किरण कचरे

जिल्हा सचिव — स्वनील गायकवाड
तालुका अध्यक्ष — शेखर आटकळे
तालुका सचिव — सोमनाथ कदम

लखन चव्हाण आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *