Uncategorized

महिला बचत गट,महिला संस्थांच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना मिळणार घरपोहोच आहार    

अंगणवाडीतील बालकांना घरपोहोच सकस आहार पोहोच करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने घेतला असून या नुसार घरपोहोच आहार पोहोच करण्यासाठी सध्या निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत.या कामासाठी केवळ महिला मंडळ,महिला संस्था आणि महिला बचत गट यांनाच प्राधान्य देण्यात आले असून या कामासाठीची निविदा प्रक्रिया सध्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सुरु आहे.२१ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.पंढरपुर शहर व तालुक्यात अनेक महिला बचत गट,महिला संस्था आणि महिला मंडळे अतिशय कार्यरत असून बहुतांश पात्र संस्था आणि बचत गटांना या निविदा प्रक्रियेची माहितीच नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर तालुक्यात ५९ युनिट 316 अंगणवाडी तर शहरात ८ युनिट 45 अंगणवाडी संख्या असून या अंतर्गत एकूण ३६१ अंगणवाडी संख्या आहे.      

पंढरी वार्ताने या बाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सदर टेंडर निघाले आहे याची आम्हाला माहितीच नाही अशी प्रतिक्रिया उल्लेखनीय काम करणाऱ्या काही महिला बचत गटांच्या महिला सदस्यांनी व्यक्त केली आहे.या निविदा प्रक्रियेची अंतिम मुदत वाढविली तर आम्हीही या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ व शासनाच्या निकषानुसार सर्व पूर्तता करत हे काम करू,त्यामुळे या निविदा प्रक्रियेची मुदत वाढवावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.

 

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *