ताज्याघडामोडी

आमदार स्थानिक विकास निधी माढा मतदारसंघातील कामांसाठी 80 लाखाचा निधी मंजूर-आ.बबनदादा शिंदे.

माढा मतदारसंघात सामाविष्ठ माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून सन 2020-21 कार्यक्रमाअंतर्गत व्यायामशाळा,व्यायामशाळा साहित्य,सभामंडप व सामाजिक सभागृह यासाठी रक्कम रु. 80 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले माढा मतदारसंघात समाविष्ठ माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत कामे सुचविण्यात आली होती.त्यानुसार सन 2020-21 कार्यक्रमाअतंर्गत माढा तालुक्यातील मौजे अकोले (खु) महाडीक वस्ती हनुमान मंदीरासमोर सभामंडप बांधणे – रक्कम रु. 7 लाख, मौजे बावी येथील विठ्ठल मंदीरासमोर सभामंडप बांधणे – रक्कम रु. 8 लाख, मौजे चांदज येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे – रक्कम रु. 9 लाख, मौजे टेंभुर्णी येथे 1) कसबा पेठ श्रीराम मंदीरासमोर सभामंडप बांधणे – रक्कम रु. 9 लाख, 2) लोंढे वस्ती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर संत गाडगेबाबा मंदीर येथे ग्रां.प.जागेत सभामंडप बांधणे – रक्कम रु. 7 लाख, मौजे आलेगांव (खु) येथे पुनर्वसन गावठाण मंदीरासमोर सभामंडप बांधणे – रक्कम रु. 7 लाख, मौजे शेवरे येथील तुळजाभवानी मंदीरासमोर ग्रा.प.जागेत सभामंडप बांधणे – रक्कम रु. 7 लाख, मौजे आलेगांव (बु) येथील लक्ष्मीआई मंदीर (दलीत वस्ती) ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे – रक्कम रु. 7 लाख, मौजे शिराळ (मा) येथे दलीत वस्तीत ग्रा.प.जागेत सामाजिक सभागृह बांधणे- रक्कम रु. 7 लाख, तसेच पंढरपूर तालुक्यातील मौजे जाधववाडी येथे ग्रा.पं.जागेत व्यायामशाळा बांधणे – रक्कम रु. 7 लाख 99 हजार रुपये, तसेच माळशिरस तालुक्यातील मौजे वाफेगांव येथे व्यायामशाळेस व्यायामसाहित्य देणे – रक्कम रु. 2 लाख, देणेसाठी एकत्रिक मिळून रक्कम रु. 80 लाखाचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *