ताज्याघडामोडी

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा संपणार… ‘या’ तारखा महत्त्वाच्या…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून आहे. मात्र, हा निकाल आता लवकरच येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रकरणावर प्रदीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालायने आपला निकाल राखीव ठेवला आहे. मात्र, आता निकालाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. 8 ते 12 मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच तारखांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच कायदेतज्ज्ञांच्या वर्तुळातही हीच चर्चा आहे.

ज्या घटनापीठासमोर महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यातील एक न्यायामूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निकाल त्याच्याआधीच येणार आहे. त्यामुळे हा निकाल १५ मेच्या आधी येणार असल्याचे सांगितले जात आहे. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 या तारखांमध्ये कोणत्यादी दिवशी निकालाची शक्यता आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. जवळपास २६ जून २०२२ पासून या प्रकरणात सर्वोच न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सुरुवातीला सुट्टीकालीन दोन न्यायामूर्तींच्या समोर सुनावणी झाली. त्यानंतर माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आणि नंतर पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला सत्तासंघर्षाचा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठासमोर दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आहे. दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा आहे. दिल्ली आणि केंद्र सरकारचे प्रकरणाचा निकाल 17 जानेवारीपासून प्रलंबित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *