गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाच्याने अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेलिंगमुळे मामीने जीवन संपवलं; भाचा म्हणतो, तीच मला…

भाच्याने आधी लपून छपून आपल्याच मामीचा नको त्या अवस्थेतील व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा अश्लील व्हिडिओ दाखवून तो मामीला ब्लॅकमेल करु लागला. परंतु भाच्याच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. महिलेने रात्रीच्या वेळेस राहत्या घरातच आत्महत्या केली. बिहारमधील नालंदा येथे पहाडपुरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

भाच्याकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेने सोमवारी ५ जून रोजी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. मृत महिला तीन मुलांची आई आहे, तर आरोपी भाचा हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तीन वर्षांपूर्वी त्याच्या आजी-आजोबांच्या घरी आला होता. या काळात तो आपल्या मामीच्या प्रेमात पडला होता. एकतर्फी प्रेमातून तो आपल्याच मामीशी अश्लील भाषेत बोलू लागला. त्यावरुन तिने त्याला अनेक वेळा शिवीगाळही केली होती. यानंतरही तो सुधारला नाही.

त्याने लपूनछपून आपल्या मामीचा अश्लील व्हिडिओ शूट केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीला भाच्याला ब्लॅकमेल करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने आपले जीवन संपवले.महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच तिच्या आई-वडिलांनी घाईघाईत सासर गाठले. महिलेच्या भावाने तिचा मोबाईल शोधला. बहिणीच्या मोबाईलचा पासवर्ड त्याला माहिती होता. फोन अनलॉक करताच भाचा ब्लॅकमेल करत असल्याचं तिने लिहिलं सापडलं. चॅटिंगमध्ये भाच्याने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही लिहिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *