ताज्याघडामोडी

दामाजी’च्या एकाही शेतकरी सभासदाचे सभासदत्व रद्द केले नाही ; समाधान आवताडे

दामाजी’च्या एकाही शेतकरी सभासदाचे सभासदत्व रद्द केले नाही ; समाधान आवताडे
  मंगळवेढा  –   मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ,खुपसंगी, गोणेवाडी,शिरशी, नंदेश्वर, जुनोनी या भागात प्रचारसभा झाल्या.
प्रचारादरम्यान विरोधकांकडून दामाजी कारखान्याच्या 19 हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करून स्वतःचा खाजगी कारखाना करण्याचा  समाधान आवताडे यांच्यावर प्रचारात आरोप होत आहे,  मात्र विरोधकांचे सर्व आरोप समाधान आवताडे यांनी खोडुन काढत उत्तर दिले. मी जे बोलतो ते करतो, निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासना प्रमाणे 10 रुपये किलो साखर दिली. 
97 ची घटना मागच्या संचालक मंडळाने स्विकारली, त्यात नमूद होतं, क्रियाशील व अक्रियाशील कसे ठरवायचे हा कायदा अंमलात आणला नसता तर संचालक मंडळ बरखास्त होऊ शकलं असतं, कारखान्यावर प्रशासक आला असता, परंतू 97 व्या घटना दुरुस्तीचा भाग म्हणून अक्रियाशील सभासदांना नोटिसा देणं गरजेचं होतं. पाच वर्षे जी संस्था चालू आहे त्या सर्व संस्थांना या घटनेचे पालन करावे लागते तसे न केल्यास शासन संचालक मंडळ बरखास्त करते व प्रशासक नियुक्त करते. त्यामुळे नोटिसा द्यायच्या की नाही आम्ही या द्विधा मनस्थितीत होतो, मात्र इतर संस्था व कारखान्यांची माहिती घेतली तुम्ही घटना स्वीकारल्यामुळे तुम्हाला नोटिसा देणे भाग आहे, म्हणून नोटिसा दिल्या आहेत.  परंतु निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर संचालक मंडळाची बैठक घेऊन ठराव मंजूर करायचा नंतर वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा घेऊन तो  ठराव पारित करून अक्रियाशील सभासदांना क्षमापीत करण्यासाठी पुन्हा क्रियाशील करून घेण्यासाठी शासनाला तो ठराव पाठविण्यात येणार आहे. आणि शासनाला तो अधिकार आहे, ते मान्य होईल, ही प्रकिया आहे. तुम्ही कुणीही अक्रियाशील सभासद होत नाही तुमची साखर चालू आहे, तुम्ही कारखान्याचा मोबदला घेत आहेत. अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे ती केवळ कागदोपत्री असून करणे आवश्यक होते. याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांचे मार्गदर्शन घेतले तेव्हा त्यांनी सांगितले की आमच्या कडे ही काही अक्रियाशील सभासद आहेत त्यासाठी आम्ही ही प्रक्रिया केली आहे. संत दामाजी कारखाना हा शेतकऱ्यांचा राजवाडा आहे तो अबाधित राहील. त्यामुळे संत दामाजी साखर कारखान्याच्या  एकाही शेतकरी सभासदावर अन्याय अथवा त्यांच्या अधिकारावर गदा येणार नाही. भूलथापांना बळी पडू नका, तुमचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही विरोधकांनी स्वतःच्या ताटातील गाढव पहिल्यांदा काढावे आमच्या ताटातील माशी आम्ही बघून घेतो असा हल्लाबोल अवताडे यांनी भालके यांच्या वर केला.   
       
या प्रचारदौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख *महाराष्ट्र राज्य माजी मंत्री, रयत क्रांतीचे पक्षप्रमुख सदाभाऊ खोत,आमदार राम सातपुते,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे,दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण,प्रा.येताळ भगत सर,प्रा.दत्तात्रय जमदाडे,त्या त्या गावातील सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते…
=============================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *