ताज्याघडामोडी

रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’

रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’
  मंगळवेढा-  मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रंगात आला आहे . भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंगळवेढ्यातील तब्बल 50 गावे त्यांनी आवताडे यांच्या सोबत पिंजून काढली आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी माघार घ्यावी म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत बबनराव आवताडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. मात्र प्रचाराच्या अर्ध्यावरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाले, त्यांनी स्वतःला होम आयसोलेट करून घेतले. घरात राहूनही मोबाईलच्या माध्यमातून संपर्क सुरू ठेवलाय, आता रणजितदादांची प्रचाराची कमान कोण सांभाळणार अशी चर्चा होती, मात्र एक दिवस जातोय ना तोपर्यंत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. केवळ धुरा सांभाळली नाही तर रणजीतदादांची कसर ही भरून काढली. त्यांच्या भाषणांनी लक्ष वेधून घेतले आहे, मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नासह माळशिरसच्या 14 गावांचा पाणीप्रश्नी बारामतीकरांना टार्गेट केले, समाधान आवताडे निवडून आल्यास सरकारची दातखिळी बसेपर्यंत आवताडे यांच्या खांद्याला खांदा लावून सरकारशी लढू व पाणी मिळवून देऊ. शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडल्याचा मुद्दा त्यांनी प्रचारात आग्रही ठेवला आहे, राम सातपुते यांनी आपल्या भाषणात विठ्ठल कारखान्याच्या कामगारांना, सभासदांना तुरुंगात टाकणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार का असा सवाल उपस्थित केला आहे. वंचित, शोषित, शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय न देण्याची भूमिका या सरकारची आहे . ही गुंडांची, सरदारांची पार्टी असल्याचा आरोप केलाय. तसेच त्यांनी भाषणातून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रवीण महाजन यांच्या लक्ष्मी ही कुणाच्या घड्याळावर, हाताच्या पंज्यावर, काठीवर, शिट्टी अथवा बॅटरीवर येत नाही तर लक्ष्मी ही कमळाच्या फुलावर बसून येते भाषणाचे उदाहरणे दिली आहेत.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, गाबन्या मेंढीची तिघांनी शिकार केली मात्र कासाचं धार काढायचं काम कुणाच्या वाट्याला येईल यासाठी भांडत आहेत,उचल्या कोण आहे? राज्याचं नुकसान करणारे कोण आहेत? 
पाणीवाटपाचा प्रश्न गाजतंय गेल्या महिन्याभरापासून पाणी सोडण्यात आले भीमा नदीचे कॅनॉल पुराप्रमाणे भरून वाहत आहेत  पहिल्या पन्नास किलोमीटर मध्ये 100 एकराचे धनिक बागायतदार शेतकरी आहेत, तिथं पाणी भरपूर मात्र आपल्याकडे पाण्यासाठी वाट पहावी लागते. इथल्या जनावरांच्या वैरणीसाठी जीव तुटतोय, पस्तीस गावच्या पाण्याबद्दल विचार मांडला जातोय, पाण्याला वळण न लावता पाण्याची चोरी करून आता या तालुक्याच्या प्रश्नाबाबत बोलत आहेत.पाणी चोरी करणारी ही टोळी असून पाणीवाटपात अटी व शर्ती लावल्या गेल्या आहेत, लाज नाही वाटत यांना. या अटी शर्ती पाहिल्या तर पाणी मिळूच नये अशी त्यांची भूमिकाआहे.
    मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी  आपल्या शुक्रवारच्या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला, आज भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाही फिरवल्यावर ती करपेल.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विश्वास टाकला या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मंगळवेढा शहरालगत 118 एकर जमीन एमआयडीसीसाठी दिली एवढ्या जमिनीमध्ये फक्त सौरऊर्जा उद्योग उभारला. त्यामुळे या मतदारसंघात औद्योगिक क्रांती आणणे गरजेचे आहे, युवकांच्या हाताला काम महत्वाचे आहे.
विरोधक सहानुभूतीवर निवडणूक लढवत आहेत, जर भारत नानांना खरीच श्रद्धांजली अर्पण करायची होती तर अधिवेशनात बारामती सिंचन योजनेला दिलेला 500 कोटींचा निधी मंगळवेढ्याच्या 35 गावांच्या पाण्यासाठी का वळवला नाही? असा सवाल आवताडे यांनी उपस्थित केला.       
या प्रचारदौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख *महाराष्ट्र राज्य माजी मंत्री, रयत क्रांतीचे पक्षप्रमुख सदाभाऊ खोत,आमदार राम सातपुते,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे,दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण,प्रा.येताळ भगत सर,प्रा.दत्तात्रय जमदाडे,त्या त्या गावातील सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *