बीड जिल्ह्यात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या दोघांनी एकाच साडीला गळफास घेतला होता. मात्र, महिलेच्या भागाकडील साडीची गाठ सुटल्याने ती यातून बचावली आहे. मात्र, तरुणाचा मृत्यू झाला आहे. या युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत. महिलेने याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. बीडमधील जयपाल व्हावल (24) आणि ठाण्यातील एका […]
गुन्हे विश्व
लग्नानंतर 15 वर्षांनी फेसबुकवर भेटला प्रियकर; दोन मुलांना सोडून महिला पळाली
प्रेम आधळं असतं…प्रेमात सर्व क्षम्य असतं…प्रेमासाठी काहीही… असे अनेकजण म्हणतात. मात्र, प्रेमामध्ये काही धक्कादायक किंवा आश्चर्यचकीत करणाऱ्या घटनाही घडतात. पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अशीच आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. विवाहित महिलेला लग्नाच्या 15 वर्षांनंतर फेसबुकवर प्रियकर भेटला. त्यांच्यातील प्रेम पुन्हा बहरले आणि प्रेमात वाहवत जात महिलेने दोन मुलांना सोडून प्रियकरासोबत पलायन केले आहे. पोलीस महिलेचा शोध […]
तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितले 20 लाख, एकाला अटक
तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी मागणाऱ्याला सांगलीच्या मिरज पोलिसांनी अटक केलीय. यल्लाप्पा चंद्रकांत कोळी असं अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आरोपीनं कॉलेज तरुणीची अश्लील चित्रफीत तयार केली. ती क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरेपीनं 20 लाखांची खंडणी मागितली होती.
“अफवा पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्स बंद करणार”, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि […]
नगरपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री, मारहाणीत एकाचा मृत्यू
राज्यभरातील नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला असून या निकालात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू […]
पब्जीच्या वादातून तरुणाचे अपहरण, बँकेतून काढले पैसे
पब्जी खेळाच्या वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या बँक खात्यातून पैसे काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी असदअली अश्रफअली शेख, दिवेश रेड्डी, आतिफ शेख, राजेश बेंडर, रसूल शेखला अटक केली आहे. तक्रारदाराची काही दिवसांपूर्वी आरोपीसोबत फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मोबाईलवर पब्जी खेळायचे. अटक आरोपीपैकी एकाने तक्रारदाराला पब्जी खेळासाठी […]
लग्नास नकार दिल्याने संतप्त प्रियसीकडून प्रियकारावर चाकूने वार
लग्नास नकार दिल्याने संतप्त प्रियसीने चाकूने वार करून प्रियकराची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलेली आहे. नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय ढोके असे या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर पूजा असे हल्लेखोर प्रेयसीचे नाव आहे. अक्षय एका खाजगी कंपनीत कामाला आहे.पूजा घटस्फोटीत आहे. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये […]
बायको मुलांना विष दिलं, मग स्वतः गळफास घेतला! अख्ख्या कुटुंबानं केली आत्महत्या
मदन चायनीज नावाच्या व्यक्तीनं घरातील तिघांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मदन चायनीज यांना दोन मुलं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आधी विष दिलं. त्यानंतर बायकोलाही विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलं. नेमकी त्यांनी आत्महत्या का केली, हे कळू […]
पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून तरुणाचा संताप; आरोपीला स्फोटात थेट उडवूनच टाकलं!
सूड उगवण्याच्या अनेक कहाण्या तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील. मात्र ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रत्तागड नावाच्या छोट्याशा गावातील आहे. येथे 4 जानेवारी रोजी एक शेतकरी शेतात ट्यूबवेलचं बटन दाबतो आणि स्फोटात तो छिन्नविधिन्न होतो. स्फोटाचा आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येतो. काही वेळानंतर गावकरी तेथे पोहोचले तोपर्यंत त्याचा […]
गुटखा माफियांचे मोठे मासे गळाला लागले, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
बुलडाणा जिल्हा हा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं होमटाऊन आहे. एफडीए मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध धंदे होतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. मात्र गुटखा माफियांच्या विरोधात प्रामुख्याने खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या परिक्षेत्रामध्येच म्हणजे घाटाखालील तालुक्यात कारवाई होताना दिसत आहे. आतापर्यंत कधीही पोलिसांच्या हातात न आलेले दोन गुटखा माफियांच्या […]











