मदन चायनीज नावाच्या व्यक्तीनं घरातील तिघांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मदन चायनीज यांना दोन मुलं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आधी विष दिलं. त्यानंतर बायकोलाही विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलं.
नेमकी त्यांनी आत्महत्या का केली, हे कळू शकलेलं नाही. मात्र या घटनेनं नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक शोध घेत आहेत. मदन चायनीज असं गळफास घेऊन आत्महत्या कऱणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी आपलं अख्खं कुटुंब विष देऊन संपवलंय.
बराच वेळ घरात काही हालचाल होत नाही, हे पाहून शेजारच्यांनी पाहणी केलं. तेव्हा समोर दिसलेल्या चित्रानं सगळेच हादरुन गेले होते. याबाबतची माहिती पोलिसांनी देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. मदन चायनीज यांची चायनीजच्या गाडीचा व्यवसाय होता. प्रचंड नुकसान आणि आर्थिक चढाओढींमुळे तणावात असलेल्या मदन यांनी आपल्या कुटुंबासह स्वतःही जीव दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
कर्जामुळे आत्महत्या?
अद्याप या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नसलं, तरी कर्जामुळे मदन चायनीज यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्याअनुशंगानं पोलिस पुढील तपास करत आहेत. कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून मदन चायनीज यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आता पोलिस तपासातून काय अधिक माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.