गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर 15 वर्षांनी फेसबुकवर भेटला प्रियकर; दोन मुलांना सोडून महिला पळाली

प्रेम आधळं असतं…प्रेमात सर्व क्षम्य असतं…प्रेमासाठी काहीही… असे अनेकजण म्हणतात. मात्र, प्रेमामध्ये काही धक्कादायक किंवा आश्चर्यचकीत करणाऱ्या घटनाही घडतात.

पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अशीच आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. विवाहित महिलेला लग्नाच्या 15 वर्षांनंतर फेसबुकवर प्रियकर भेटला. त्यांच्यातील प्रेम पुन्हा बहरले आणि प्रेमात वाहवत जात महिलेने दोन मुलांना सोडून प्रियकरासोबत पलायन केले आहे. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.

पश्चिम बंगलच्या हुगळीच्या रिसडामध्ये ही घटना घडली आहे. महिला बेपत्ता झाल्याचे समजताच तिच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गेल्या काही दिवसांपासून पत्नी नेहमी फेसबुकवर असायची. ती एका तरुणासोबत चॅट करत होती. अचानक 14 जानेवारीला ती प्रियकरासोबत पळून गेल्याची तक्रार महिलेच्या पतीने दाखल केली आहे.

6 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा मुलाला सोडून ती प्रियकरासोबत पळून गेल्याचे पतीने सांगितले. महिलेच्या पतीने तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप तिची कोणतीही माहित मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबतच पळाली आहे, असे तिच्या नवऱ्याने सांगितले. 15 वर्षांपूर्वी हुगळीच्या कोननगरमधील कविताशी आपले लग्न झाले. आमच्यातील संबंध नेहमी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे होते. आम्हाला दोन मुलेही झाली. आमचा सुखाचा संसार सुरू असताना अचानक त्याला दुष्ट लागली.

लग्नाच्या 15 वर्षानंतर पत्नीला फेसबुकवर तिचा प्रियकर भेटला. ती त्याच्याशी सतत चॅट करत होती. आपल्याला आमच्या नात्यावर विश्वास होता. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्याला आणि दोन मुलांना सोडून ती पळून जाण्याचा निर्णय घेईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे पतीने सांगितले.

प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीला लवकरात लवकर शोधावे, असे पतीने पोलिसांना सांगितले. पत्नी पळून गेल्यापासून 6 वर्षांची मुलगी रडून रडून बेजार झाली आहे. आई कुठे गेली तेच तिला समजत नाही. तिला कसे समजवायचे, असा प्रश्न आमच्यापुढे उभा आहे.

महिलेला शोधण्यासाठी सर्व्हिलान्स पथकाचीही मदत घेण्यात येत आहे. तसेच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरही पोलिसांची नजर आहे. मात्र, महिलेबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. महिलेला लवकरात लवकर पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *