गुन्हे विश्व

खा.अमोल कोल्हेनी केलेले कौतुक वाया गेले, लाखोंची हंडी अखेर फुटलीच !

‘प्रोटेक्टर’ अडचणीत येणार ? ६ महिन्यात दुप्पट करून देतो या नावाखाली एका मॅकेनिकची फसवणूक केल्या प्रकरणी प्रथमेश कट्टे व शुभम कोरके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि ३५,४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला प्रथमेश कट्टे हा या बनवाबनवी प्रकरणातील प्रमुख आरोपी असून मागील जवळपास दीड वर्षांपासून ‘संकल्प’ची हंडी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणींची छेड काढली म्हणून जाब विचारताच मुख्याध्यापक, हॉस्टेल अधीक्षकांवर तलवार हल्ला !

मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ घडली. कन्नड शहरा जवळील साखर कारखान्यासमोर आसलेल्या कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयात ही खळबळजनक घटना आज घडली. या घडनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुजीब जमील शेख असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना जाहिरातीच्या नावाखाली 25 हजारांची मागणी करुन 10 हजार रुपये स्वीकारल्यानंतर साप्ताहिकाच्या संपादकास अटक करण्यात आली आहे. जावेद शेख असे आरोपीचे नाव आहे. ‘बातमी मागची बातमी’ या साप्ताहिकाचे संपादक जावेद शेख यांनी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना ते संपादक असलेल्या साप्ताहिकासाठी जाहिरातीच्या किमतीचे दर पत्रक व्हॉट्सअपवर पाठवले. तसेच फोन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केस वाढवल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; धक्कादायक घटना

 शाळेतील विद्यार्थ्यांचे केस, नखे तसेच गणवेश व्वयस्थित आहे की नाही हे शिक्षकांकडून तपासण्यात येत असते. केस किंवा नखे वाढली असतील तर विद्यार्थ्यांना समज देऊन कापण्याचे सांगण्यात येते. पण कणकवलीतील एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारले आणि केसाला धरून डोके आपटले असल्याची तक्रार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बिलासाठी ‘डांबून’ ठेवलेल्या बाळाला मिळाला डिस्चार्ज, युवासेनेचा रुग्णालयाला दणका

कर्ज-उसनवाऱ्या करून पोटच्या गोळ्याच्या उपचारासाठी तब्बल 17 लाख रुपये मोजूनही उर्वरित 9 लाखांच्या बिलासाठी बाळाला डांबून ठेवणाऱ्या खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलला चांगलाच दणका बसला आहे. पालकाांनी कैफियत मांडताच त्याची गंभीर दखल घेत युवासैनिकांनी या रुग्णालयावर धडक देत जाब विचारला. त्यामुळे तंतरलेल्या व्यवस्थापनाने बिलासाठी अडकवून ठेवलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला अखेर डिस्चार्ज दिला आहे. इतकेच नाही तर राहिलेले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

4 मुलांच्या आईकडून 23 वर्षांनी लहान प्रियकराची हत्या; शेवटी पार्टनरचाही भांडाफोड

आरोपी महिलेला 4 मुलं आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. मृत तरुण आणि महिलेमध्ये तिच्या लिव्ह इन पार्टनरवरुन वाद झाला होता. ज्यानंतर महिलेने वीट उचलून प्रियकराच्या डोक्यात मारलं. यात त्याचा मृत्यू झाला. ACP राजीव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार नगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. ज्याचं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात सायबर क्राईम तज्ञ् पोलीस कर्मचाऱ्यांच अट्टल गुन्हेगाराच्या तोडीचे कृत्य

पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान शरमेने झुकली जाईल अशी एक घटना उघडकीस आली आहे. शेकडो कोटींचे क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या एका व्यापाऱ्याच अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात त्याच्या इतर आठ साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप तुकाराम खंदारे अस आरोपी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

50 लाखांसाठी फॉर्च्यूनर गाडीसह व्यापाऱ्याचं अपहरण; 10 तास रंगलं थरारनाट्य

मुंबईत एका ड्रायफ्रुट व्यापाऱ्याला आणि त्यांच्या ड्रायव्हरला फॉर्च्यूनर गाडीसह अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, मुंबईतील समता नगर पोलिसांनी अवघ्या 10 तासांतच बोरिवली परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. ड्रायफ्रुट व्यापाऱ्यासह चालक सुखरूप बचावला आहे. पोलिसांनी फॉर्च्यूनर गाडीही ताब्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! जागरणाला गेलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत, अर्धनग्नावस्थेत शेतात आढळला मृतदेह

जागरणाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडलेल्या विवाहित महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित महिला जागरणाच्या कार्यक्रमासाठी गेली होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती घरी परतलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच्याच एका शेतात तिचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनेचा पुढील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तळघरात 650 लॉकर, कोट्यवधी रुपये जप्त; नोएडामध्ये माजी IPS च्या घरावर छापे

संसदेत मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे अनेकांचे बजेट कोलमडले असले तरी काहीजण कोरोना काळातही मालामाल झाले आहेत. गैरमार्गाने मालमाल झालेल्यांवर आयकर विभागाची नजर आहे. आयकर विभागाने नोएडामधील माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी आढळलेल्या कोट्यवधींच्या रकमेने अधिकारीही चक्रावले आहेत. नोएडातील माजी सनदी अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरावर गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. […]