गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माझ्या हॉटेलपेक्षा त्याच्या हॉटेलचा धंदा जास्त

पुण्यातील प्रसिद्ध गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. गारवा हॉलेटच्या शेजारी अशोका हॉटेल होतं. या हॉटेलच्या मालकांनी सराईत गुन्हेगार भाच्याला सुपारी देऊन गारबा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात लोणी काळभोर पालिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुंड संदीप मोहोळ खूनप्रकरणात तिघांना ‘जन्मठेप’; गणेश मारणेसह 12 जणांची निर्दोष मुक्तता

गुंड संदीप मोहोळ याच्या खूनप्रकरणात तिघांना जन्मठेप आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, 12 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सचिन पोटे, जमीर शेख, संतोष लांडे यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर, तिघा आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा निकाल दिला. टोळीच्या वर्चस्व वादातून गुंड संदीप […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आमची परत बातमी दिली तर तुला जिवे ठार मारू !

भीमा नदीकाठच्या अनेक गावात वाळू चोरांनी उच्छाद मांडला असून नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करीत त्यांच्या शेतीतून वाट काढत अवैध वाळू उपसा करायचा,त्याच ठिकाणी साठा करायचा आणि शेतकऱ्याने विरोध केला तर त्याला दमदाटी करायची असे प्रकार सातत्याने होत असल्याची चर्चा आहे.अशातच पोलीस अथवा महसूलच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच तर ज्या ठिकाणी वाळूचा साठा आढळून आला आहे त्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा  गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुळशी पॅटर्नची नक्कल करणारे स्टेट्स पडले महागात 

गावात आपलीच हवा असावी एखादी हिरोईन टाईप गर्लफ्रेंड असावी अशी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनाही संख्या आपल्यात काही कमी नाही.कुणी स्पर्धा परीक्षांत यश मिळवून,सैनिक अथवा पोलीस भरती होऊन,विविध शालेय अथवा महाविद्यलयीन परीक्षांमध्ये यश मिळवून गावात नावलौकिक मिळवतात,शाश्वत हवा करतात.मात्र काही तरुण चित्रपटाप्रमाणेच जीवन असते असा समज करून घेत गुन्हेगारी वृत्तीचा अवलंब करत हवा करायला जातात,काही काळ आपल्या परिसरात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा येतोय म्हणून पोलिसांनी मारली शिट्टी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशी महापूजेसाठी पंढरपूरला येत असल्यामुळे त्यांच्या वाहनांचा ताफा येत असलेल्या रस्त्यावर जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पंढरपूर-करकंब रस्त्यावरील आजोती पाटी येथे बदोबस्तासाठी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने येणारी एक दुचाकी अतिशय भरधाव वेगाने येत असल्याचे आढळून आले,करकंबकडून मुख्यमंत्रांच्या गाड्यांचा कॅनवाय येत असल्याने पोलिसांनी भरधाव वेगातील दुचाकी थांबविण्यासाठी शिट्टी मारली खरी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपच्या माजी नगरसेवकाने दिली खुनाची सुपारी,घटनेपूर्वीच सुपारी किलर पोलिसांच्या ताब्यात

पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांनी त्यांचा विरोधक असलेल्या बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला दिली असल्याची व हे दोन्ही सराईत सुपारी किलर खुनाच्या हेतूने वावरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे गस्तीवर असताना पोलीस कर्मचारी सुशील धिवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईत भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद

मुंबईत एका वकिलावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे. तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माढ्याच्या सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील ४ आरोपी पसार

विविध गंभीर गुन्ह्यात माढा सबजेलमध्ये अटकेत असलेले सिद्धेश्वर कैचै,अकबर सिद्दाप्ना पवार,आकाश उर्फ अक्षय राॅकी भालकर,तानाजी लोकरे चार सराईत गुन्हेगार ड्युटीवर असलेल्या पोलिसांशी झटापट करून पळून जाण्यात यशस्वी ठरले असून या घटनेमुळे माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.या चारही आरोपीना ताब्यात घेण्यासाठी माढा पोलीस प्रयत्नांची शिकस्त करत असून सर्वत्र कडक नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुना कराड नाका येथे भरधाव वेगातील रिक्षाच्या धडकेत रेल्वे अभियंत्यांचा मृत्यू

भरधाव वेगातील रिक्षा चालकाने पंढरपुर शहातील जुना कराडनाका नजीक ऍक्टिव्हा दुचाकीवरुन भाजी आणण्यासाठी निघालेले रेल्वेचे सिनिअर सेक्शन इंजिनीअर बबलु अहिरवार यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे जुना कराड नाका व रेल्वे कॉलनी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी रिक्षाचालक रामा सुनिल मोटे रा कोर्टी ता पंढरपुर याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा […]