पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील अर्बन बँकेनजीक असलेल्या दहिवडकर वडा-भजी पाव सेंटर येथे भजी खरेदीसाठी गेलेल्या शंतनु धनंजय मोरे,वय-26वर्ष,धंदा-नोकरी जात-मराठा,रा-परदेशी नगर पंढरपूर या तरुणास या ठिकाणी भजी घेण्यासाठी आलेल्या २ तरुणांनी शिविगाळ करत लाथा बुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची फिर्याद सदर शंतनु धनंजय मोरे याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तर या झटापटीत […]
गुन्हे विश्व
साहेबांचा आदेश आहे चोऱ्या माऱ्या होऊ लागल्यात तुम्ही दागिने घालून कशाला फिरता !
पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली परिसरात राहणारी महिला आपल्या डॉक्टर पतीसह केबीपी चौकातून बायपास रस्त्याने नातेवाईकाकडे निघालेले असता पाठीमागून दुचाकी वरून आलेले तरुणाने गाडी थांबविण्यास सांगून साहेबांचा आदेश आहे चोऱ्या माऱ्या होऊ लागल्यात असे म्हणत फिर्यादी महिलेस तुमच्या हातातील पाटल्या तुमच्या पर्स मध्ये ठेवा. त्याप्रमाणे फिर्यादीने पाटल्या काडुन पर्स मध्ये ठेवल्या तेव्हा त्या व्यक्तीने गळ्यातील साखळीतील […]
पतसंस्थेची फसवणूक करणारा उद्योजक गजाआड
संगमनेर येथील श्री.भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेतून कर्ज काढून पुन्हा खोटा दस्तऐवज करून संग्राम पतसंस्थेतून लाखोचे कर्ज काढून फसवणूक करणारा उद्याेजक प्रवीण देशमुख (४२, नवलेवाडी-अकोले) याला पतसंस्थेचे मॅनेजर उमेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली. देशमुखची पत्नी व बनावट दस्तऐवज तयार करणारा तलाठी गुलाब बारामते (धुमाळवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत […]
दागिन्यांच्या बदल्यात बनावट सोने देऊन फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल
सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात सोनेरी रंगाचे धातूचे बिस्किट देत दोन अज्ञातांनी वेळेकामथी (ता. सातारा) येथील महिलेकडील 33 हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले. पद्मा सुनील शिंदे (वय 55) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. पद्मा शिंदे बसस्थानकापासून चालत पोवई नाक्याकडे येत होत्या. तहसीलदार कार्यालयासमोर आल्या असताना त्यांना वाटेत एक धातूचे बिस्कीट पडल्याचे दिसले. त्यांनी ते उचलले. याचदरम्यान त्याठिकाणी […]
प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केलं; पण विवाहानंतर 18 दिवसातच नवरीने दाखवला खरा रंग
एक लग्नाची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील सामान घेऊन फरार झालेल्या नवरीबाईसह एका महिला दलालाला राजस्थानच्या जालोर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, भीनमाळच्या माघ कॉलनीत राहणारा अभिषेक उर्फ धरमचंद जैन याने सीता गुप्ता नावाच्या महिलेशी पूर्ण रितीरिवाजाने लग्न केलं होतं. स्वरूपगंजमध्ये राहणाऱ्या मनीषा सेनच्या मध्यस्तरीनंतर हा विवाह झाला […]
बिअर साठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांनी पोटात खुपसली बिअरची बॉटल
बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून 2 मित्रांनी त्यांच्या मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील बरसा मुंडा चौकातील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही मित्र बिअर पीत बसले होते. मात्र अजून बिअर पिण्यासाठी आरोपींनी शाहरुख पठाण या मित्राकडे पैसे मागितले. मात्र […]
भाई न म्हटल्याने तरुणाला बेल्टने केली बेदम मारहाण, जमिनीवर फेकलेली बिस्किटे खाण्यासही भाग पाडले
भाई (डॉन) न म्हटल्याने एका कुख्यात गुन्हेगारासह चौघांनी एका तरुणाला बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी पीडिताला जमिनीवर फेकलेली बिस्किटे तोंडाने उचलून खाण्यास भाग पाडले. ही हृदयद्रावक घटना पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील गणेशनगर भागातील आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच रोहन वाघमारे, प्रशांत आठवडे, आदित्य काटे आणि प्रेम शिंदे यांच्यावर […]
नववीत शिकणाऱ्या २ विद्यार्थिनींची आत्महत्या
सातारा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. यातील एका विद्यार्थिनीने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्येमागील धक्कादायक कारण उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शाहुपुरी येथे नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ म्हणून तिने हे […]
तथाकथित आध्यात्मिक गुरु भैयू महाराज आत्महत्या प्रकरणी तिघांना शिक्षा
दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आज इंदौर येथील सेशन्स कोर्टात अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांना दोषी ठरवलं आहे. या दोघांसोबतच पलक नावाच्या महिलेला देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. या पलकने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडीओ बनवले होते, […]
पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश
मुंबईतील दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईतील दहिसर परिसरात क्राईम ब्रांचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी […]











