कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात एका तरुणीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर जवळपास दीड महिन्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणातून पोलिसांनी मृत तरुणीच्या एका मित्राविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी अद्याप संशयित आरोपीला अटक केली नसून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. […]
गुन्हे विश्व
पत्नीला मेकअप नाही आवडला; पालिकेच्या अभियंत्यानं थेट ब्युटी पार्लरवर बुलडोझर चालवला
हरयाणाच्या गुरुग्राममध्य एक अजब घटना घडली आहे. महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्यानं एका सलूनवर बुलडोझर चालवला आहे. सलूनमध्य कोणतंही बेकायदेशीर काम चाललेलं नव्हतं. अतिक्रमणदेखील झालेलं नव्हतं. पण तरीही अभियंत्यानं सलूनवर तोडक कारवाई केली. कनिष्ठ अभियंत्याची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी गेली होती. पत्नीला मेकअप आवडला नाही. त्यामुळे अभियंत्यानं सलूनवर थेट बुलडोझर चालवला. प्रकरण चर्चेत येताच प्रशासनानं अभियंत्यावर […]
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करुन युवकाने स्वतः विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. आरोपीनेही विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात […]
पठ्ठ्याने साडेतीन एकरांत फुलवली अफूची शेती, गोण्या भरून पोलिसांची दमछाक
जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वाळकी याठिकाणी एका शेतकऱ्यानं साडेतीन एकरावर अफूची शेती लावली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली असता, संबंधित प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून पोलीस अफूचं पीक उपटण्याचं काम करत आहेत. आतापर्यंत एक हजार गोणी अफू उपटला आहे. अजूनही अंदाजे 500 गोणी […]
संतप्त शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय
शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगलीच्या कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा […]
पंढरपुरातील नवीन कराड नाका परिसरातील बंगल्यातून लाखोंचे दागिने लंपास
पंढरपूर शहरातील नवीन कराड नाका परिसरातील लाईफलाईन हॉस्पिटल मागील दत्त नगर या वसाहतीत मुंकुद कवडे यांचे बंगल्यात न्यायालयीन कर्मचारी मिलींद नरखेडकर हे सहकुटूंब भाडेकरू म्हणून राहतात. दिनांक 28/01/2022 रोजी नागालँड परिसरात राहणाऱ्या नातेवाईकाचे निधन झाल्याने मिलिंद नरखेडकर यांच्या पत्नी सारिका व दोन्ही मुले हे नातेवाईकाच्या घरी गेले होते.दिनांक २४ /२/२०२२ रोजी परगावी जाण्यासाठी निघाले असता घरातील […]
अभिनेत्रीकडून वेश्याव्यवसाय, दोन दलालांना अटक; तीन महिलांची सुटका
छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीकडून काही दलाल पिंपरी-चिंचवड शहरात वेश्याव्यवसाय करून घेत होते. या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. 23) ताथवडे येथील एका लॉजवर करण्यात आली.जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (48, रा. वाघोली, मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), […]
महावितरण अधिकार्याच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडला साप
इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) चक्क साप सोडला. वीजप्रश्नी राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनात हा भाग असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी झालेल्या आंदोलकांवर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आंदोलन सुरू […]
लग्नानंतर 20 दिवसातच नवरीने केला धक्कादायक खुलासा; ऐकताच हादरला पती, गाठलं पोलीस ठाणं
तेल, गॅस आणि कोळसा उत्खननामुळे झपाट्याने बदलणाऱ्या बारमेर जिल्ह्यात फसव्या नवऱ्या आणि त्यांच्या दलालांनी आपलं जाळं भक्कम केलं आहे. अशाच एका घटनेत बारमेर जिल्ह्यात पुन्हा एकदा नवरीने तिच्या टोळीतील सदस्यांसह एका कुटुंबाला लक्ष्य केलं. गुजरातमधील रहिवासी असलेली ही नवरी 20 दिवस आपल्या पतीसोबत राहून लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळून गेली. फरार नवरी आधीच विवाहित असून […]
नक्कल करण्यासाठी विद्यार्थ्याने लढवली हायटेक शक्कल! शिक्षकही झाले थक्क
परीक्षेत नक्कल अर्थात कॉपी करणं हा काही नवीन प्रकार नाही. पण, काळाच्या ओघात कॉपी करण्याच्या पद्धती मात्र आधुनिक होत चालल्या आहेत. मध्य प्रदेशात अशाच एका शक्कलेमुळे शिक्षकही थक्क झाले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षेवेळी हा प्रकार घडला आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा भलताच वापर करून या विद्यार्थ्याने अशी काही युक्ती लढवली की […]











