गुन्हे विश्व

पंढरपुरातील नवीन कराड नाका परिसरातील बंगल्यातून लाखोंचे दागिने लंपास

पंढरपूर शहरातील नवीन कराड नाका परिसरातील लाईफलाईन हॉस्पिटल मागील दत्त नगर या वसाहतीत मुंकुद कवडे यांचे बंगल्यात न्यायालयीन कर्मचारी मिलींद नरखेडकर हे सहकुटूंब भाडेकरू म्हणून राहतात.

दिनांक 28/01/2022 रोजी नागालँड परिसरात राहणाऱ्या नातेवाईकाचे निधन झाल्याने मिलिंद नरखेडकर यांच्या पत्नी सारिका व दोन्ही मुले हे नातेवाईकाच्या घरी गेले होते.दिनांक २४ /२/२०२२ रोजी परगावी जाण्यासाठी निघाले असता घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे काढण्यासाठी कपाट उघडले असता दागिने कपाटात नसल्याने दिसून आले.

छताचे दरवाजा जवळ गेले असता तो दरवाजा अर्धवट उघडा दिसला व त्या दरवाज्याचे कडी कोंयडा तुटलेला दिसला.या घटनेत चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिण्याचे वर्णनपुढील प्रमाणे आहे.

1) 1,22,500/- रु. सोन्याचे चार पदरी दोन पत्ते असलेले त्यात काळे मणी असलेले 35 ग्रम वजनाचे जु.वा.किं.अं.2) 1,75,000/-रु. सोन्याच्या प्रत्येकी 25 ग्रम वजनाच्या दोन पाटल्या जु.वा.किं.अं.3) 52,500/-रु. सोन्याची 15 ग्रम वजनाची चैन त्यामध्ये स्वस्तीक असलेले बदाम जु.वा.किं.अ.4) 17,500/-रु. सोन्याचे 5 ग्रम वजनाचे कानातील झुबे जु.वा.किं.अं.5) 17,500/-रु. सोन्याची 5 ग्रम वजनाची अंगठी त्यावर बदामाची नक्षी असलेली जु.वा.किं.अं.6) 3,500/-रु. सोन्याची 1 ग्रम वजनाची नाकातील नथ जु.वा.किं.अं. 7)7,000/-रु. सोनची 2 ग्रम वजनाची छोटी रिंग जु.वा.किं.अं. 3,95,500/-रुपये .

या प्रकरणी सरिता मिलींद नरखेडकर, वय 48 वर्षे, जात हिंदु ब्राम्हण, धंदा घरकाम, रा. बालाजी नगर, करमाळा रोड, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर सध्या रा. लाईफ लाईन हस्पीटलचे पाठीमागे, दत्तनगर, पंढरपूर यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *