अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:लाही संपवलं. पुण्यात सुटीवर आलेल्या गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याला संपवून नंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. पुणे शहरातील बालेवाडी परिसरात सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. भारत गायकवाड हे अमरावती […]
गुन्हे विश्व
मित्रांसोबत गप्पा मारणं ठरलं अखेरचं; दुचाकीवरून आले अज्ञात अन् सगळं संपलं
शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका २१ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याचा खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे […]
ऑनलाइन गेमच्या नावाखाली व्यावसायीकाची ५८ कोटींनी फसवणूक
ऑनलाइन गेमच्या नावावर सट्टा लावून जास्त नफ्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची ५८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून गोंदियातील आरोपी अनंत नवरत्न जैन याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. जिथे पोलिसांनी 10 कोटींहून अधिक रोख रकमेसह चार तोळ्यांहून अधिक किमतीचे सोने जप्त केले आहे. सध्या या पैशांची मोजणी सुरू […]
अनैतिक संबंध जीवावर बेतले; हत्या करून मृतदेह घाटात फेकला
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे. सिल्लोड येथील ही घटना आहे. या घटनेनं जिल्हात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, तर आणखी दोघांचा शोध सुरू सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राजू बाबुलाल महेर राहणार पळसी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं […]
माय-लेकीच्या खून प्रकरणाचे गुढ उलगडले… एका फोनमुळे आरोपी झाला गजाआड
दोन महिलांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. मुलीशी बोलणे होत नसल्याने, मुलीशी बोलणे करून दे असा तगादा लावल्याने जावयाने सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे खुनी जावयाने 11 महिन्यापूर्वी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचाही खून केल्याचा प्रकारदेखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबधित आरोपीस त्याच्या तीन मित्रांसह नवी मुंबई परिमंडळ 2 […]
मार्केटमध्ये नेण्यासाठी टोमॅटोचे २० क्रेट गाडीत ठेवले; पहाटे उठताच शेतकरी हादरला
सध्या टोमॅटोला सोन्यासारखे भाव आले आहेत. टोमॅटोच्या बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्यांच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत आहे. मात्र, शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे २० क्रेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अरुण बाळू ढोमे असे टोमॅटो चोरी […]
आजारी पतीच्या उपचारासाठी पडेल ते काम केलं, पण चारित्र्यावर संशय असलेल्या नवऱ्याने तिलाच संपवलं
पतीच्या उपचारासाठी पैसे जमवण्याचे काम करत असताना स्वत:च्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नागपुरातील नंदनवन झोपडपट्टी येथे घडली आहे. अर्चना रमेश भारस्कर (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा दाम्पत्याच्या मुलीही घरी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती रमेश भारस्कर हा […]
टोमॅटोतून ३० लाख रुपयांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याला अज्ञातांनी संपवलं; हत्येचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले
आंध्र प्रदेशमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये अन्नामय्या जिल्ह्यात एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हत्या मंगळवारी रात्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी केला आहे. शेतकरी नरेम हा गावात दूध द्यायला जात होता, त्यावेळी नरेम यांना हल्लेखोरांनी रोखलं. त्यानंतर त्याचे हात-पाय […]
मी तुझी फक्त मैत्रीण, पुण्यात ३७ वर्षीय महिलेचं २६ वर्षीय तरुणाला उत्तर, त्याने बर्निंग घाटात तिला…
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार असो, किंवा दर्शना पवार हत्याकांड. यासारख्या घटना पुणे शहरात ताज्या असताना एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीला मारहाण करून तिचे डोके फोडल्याचे समोर आले आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात घडली. ‘तू मला भेटत का नाहीस?’ अशी विचारणा करून तरुणाने तरुणीला दांडक्याने मारहाण केली. ‘मी तुझी फक्त मैत्रीण राहू […]
वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बापाने स्वतःच्या मुलीचा चिरला गळा
उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका मुलीच्या हत्येचं प्रकरण अखेर पोलिसांनी उकललं आहे. यात एका व्यक्तीने आपला भाऊ आणि वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आपल्याच मुलीचा गळा चिरला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात कुत्र्याचं रक्तही शिंपडलं. एवढंच नाही तर त्याने आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप गावात राहणाऱ्या 4 लोकांवर केला. पोलिसांनी […]











