‘घरकुल यादीतून माझ्या आईचे नाव का वगळले?’ अशी विचारणा करीत शिक्षकाने अकोले पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगाविल्याची घटना अकोले तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे. या प्रकरणी शिक्षकासह तिघांवर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लालू महादू वायाळ, दत्तात्रय गोविंद वायाळ व सुनील कोंडीबा वायाळ (सर्व रा. केळी ओतूर, ता. अकोले) यांच्यावर गुन्हा […]
गुन्हे विश्व
४५ दिवसांचं लग्न; Video Call करुन पत्नीनं संपवलं जीवन, पतीनंही उचललं टोकाचं पाऊल
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून लोकांचा संयम सुटत चालला असून खून आणि आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत. लखनऊमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. जिथे हाताची नस कापून पत्नीनं पतीला व्हिडिओ कॉल केला, तर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे 45 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि फोनवर वाद झाला असता पत्नीनं हाताची […]
एकाच घरात 3 वयोवृद्ध महिलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ
दापोली तालुक्यातील वणौशी गावात एकाच घरात तीन वयोवृद्ध महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दागिन्यांसाठी या महिलांना जाळून मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात संताप व्यक्त होत असून गुन्हेगारांना तात्काळ पकडावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दापोलीतील वणौशी तर्फे नातू खोतवाही गावातील बहुतांशी घरे बंद अवस्थेत आहेत. या गावातील कुटुंबे कामानिमित्त बाहेरगावी […]
शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळच्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला आहे. लहान मुलांचे भांडण आपण सर्वत्र एेकतो, पण, या शिक्षकांमधील हे लहान मुलांसारखे भांडण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी हा चावा घेतला असून ब्रह्मचैतन्य राजगुरू असे शाळेतील उपशिक्षकाचे नाव आहे.शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरु झालेला हा […]
वाहतूक पोलिसावर चौकीतच लोखंडी सळईने हल्ला; रिक्षा चालक फरार
एका रिक्षा चालकाने ऑन ड्यूटी वाहतूक पोलिसावर लोखंडी सळईने हल्ला केल्याची घटना ११ जानेवारीला रात्री घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राकेश घाडगे असं जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून खारघर पोलीस हल्लेखोर रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच […]
पंढरपूरात गणेश महाराजांनी सांगितले,दोन नंबरचे सोने निम्म्या पैशात मिळतंय !
गळ्याला कोयते लावल्याने अंगावरील सोने,रोख रक्कम देऊन आले पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील तरुण एका शोरूम मध्ये काम करत असून वाखरीतीलच एकजण व अनवली हे फिर्यादीच्या परिचयाचे आहेत.काही दिवसापूर्वी फिर्यादी यांचेसोबत पंढरपुर मध्ये असताना त्यांचे मित्र गणेश महाराज यांची भेट झाली होती.त्यावेळी गणेश महाराज नामक एका व्यक्तीने या तिघांना सांगतिले कि एका महिलेचा फोन येत आहे.दोन […]
मर्डरचा बदला डबल मर्डरने,गुंडाबरोबर त्याच्या बापाचीही हत्या
लोणीकंद भागात गोल्डमॅन अशी ओळख असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन शिंदे याची हल्लखोरांनी गोळीबार करत हत्या केली होती.या खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन खून केला. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.प्रथमेश उर्फ सनी […]
निवृत्त पोलिसाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न, सुनेसह तिघांवर गुन्हा दाखल
सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला विष पाजून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेसह तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते (सर्व रा.शेंडी बायपास, वडगाव गुप्ता) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गिन्यादेव नामदेव जाधव (वय 60, मुळ रा. बोल्हेगाव, ता. नगर, सध्या रा. पाथर्डी) यांनी […]
१३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक; चालक जखमी
राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसवर कोपरगाव येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दोन्ही बसेसच्या समोरील काचांवर ही दगडफेक करण्यात आली असून हल्लेखोर पसार झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सरकार वारंवार संप मागे घेण्याचं आवाहन करत असताना कामगार मात्र […]
नात्याला काळीमा ! नराधम भाच्याने केला मामीवर बलात्कार, व्हिडीओ बनवून करत होता ब्लॅकमेल
मध्यप्रदेशात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भाच्याने मित्रासोबत मिळून मामीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे घडली आहे. तसेच तिचा विवस्त्र व्हिडीओ करुन तिला ब्लॅकमेलही केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेशातील 21वर्षीय महिला नवऱ्यासोबत ग्वाल्हेरच्या हनुमान नगर येथे भाड्याने राहत होती. महिलेचा नवरा मजुरीचे काम करतो. […]











