गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर दाखल होणार गुन्हे

नाशिक, 27 एप्रिल: राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१० लाखांसाठी पोलिसाकडून पत्नीचा छळ ; ५ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव शहरातील शंकर आप्पा नगरात राहणाऱ्या विवाहितेने मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर परिसरात असलेल्या शंकर आप्पा नगरातील ३० वर्षीय विवाहिता अश्विनी पाटील यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

70 हजार रुपयांना 1 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 मेडीकल दुकानदारांस अटक

देशभरात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई, नागपूर यांसह अनेक ठिकाणी रेमेडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता दिल्लीत रेमडेसीवीर इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विकणाऱ्या मेडीकल दुकानदारांस अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मीरारोडमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

पुणे, 26 एप्रिल : हॉस्पिटलच्या दारात कार्डियाक रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. पुण्यातील कोंढव्यातील प्राइम हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी नगरसेवक गफूर पठाण आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक होत ही तोडफोड केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉस्पिटलला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

टपली मारल्याच्या रागातून पैलवानाचा खून

पुणे -येता जाता टपल्या मारल्याच्या रागातून पैलवानाचा कुऱ्हाड आणि तलवारीने वार करून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील अल्पवयीन चौघांसह सात जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासांत ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी रात्री गणराज चौकाजवळ घडली. सचिन तानाजी वाघमारे (22), सोमनाथ दत्तात्रय गाडे (25, दोघे रा.आंबेगाव पठार), तुषार जालिंदर सरोदे (25, रा. कात्रज) अशी अटक आरोपींची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! डॉक्टरचा घरात आढळला मृतदेह; बेशुद्ध बहिणीचाही अंत

पुणे : डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरातील घरामध्ये डॉक्‍टर मृतावस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर त्यांची बहिण घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केली. मात्र उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यु झाला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. डॉ.सुबीर सुधीर रॉय (वय 68, रा. श्‍वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड, डेक्कन), […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या “या” आमदारावर हनी ट्रॅपचा प्रयत्न;गुन्हा दाखल

पुणे जिह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एका युवतीमुळे उघडकीस आला असून, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संकटाच्या काळातही Remdesivir चा काळाबाजार!

अकोला, 24 एप्रिल: कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातलं आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आणखी बिकट आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनची आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणावत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. आपल्या जीवाभावाचा माणूस जीवंत राहावा यासाठी नातेवाईक वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. अशा परिस्थितीत अकोला शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही वाढला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नियम मोडून धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न पार पडलं. याविरोधात महापालिकेने कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं समजतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचे बळी जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक […]