गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू

अमरावती, 17 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यानं ही घटना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला अटक

ठाणे, 9 एप्रिल : ठाण्यात सध्या मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यात आता थेट ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15,00,000 रुपयांची लाच मागितली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

नाशिक, 07 एप्रिल : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (satana) साक्री रोडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNA) एका पदाधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारमध्येच त्यांनी डोक्यात गोळी झाडून जीवनयांत्रा संपवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नंदू ऊर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय 55) (Nandu ganpat shinde) […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 लाखांच्या बदल्यात 14 लाखांची मागणी करणाऱ्या खाजगी सावकारांना अटक

दहा टक्के व्याज दराने कर्ज देऊन दोन लाखांच्या बदल्यात 14 लाख रुपयांची मागणी करू त्रास देणाऱ्या दोघा खाजगी सावकारांना पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. उमेश चंद्रकांत घारे ( राहणार सन सिटी सिंहगड रस्ता पुणे) आणि संदीप घारे (वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अबब !700 कोटीची करचोरी

आयकर विभागाने धाड टाकून केलेल्या कारवाईत ७०० कोटींची करचोरी समोर आली असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाकडून हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर धाड टाकत कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ११ कोटी ८८ लाखांची रोख रक्कम तसंच १ कोटी ९३ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे. कारवाई करण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शरद पवारांच्या आजारपणा बाबत विकृत फेसबुक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. शरद पवार यांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडले.मात्र काही विकृत प्रवृत्तींनी  शरद पवारांच्या आजारपणाबाबत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू चोरांकडून लाखाची लाच घेणारा उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड निलंबित

वाळू माफियांकडून गाडी सुरू ठेवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव येथील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना 19 फेब्रुवारी च्या रात्री माजलगाव शासकीय निवासस्थानी रंगेहाथ पकडले होते.या हे प्रकरण सुरू असताना शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे.माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच मागितली होती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डमी विद्यार्थ्यांनी दिली तलाठी पदासाठी परीक्षा; बनवाबनवी अशी झाली उघड

पुणे: गेल्या वर्षी जुलै महिन्यात महापोर्टलवरून घेण्यात आलेल्या तलाठीपदाच्या परिक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पार्किंग फी च्या नावाखाली खंडणी वसुली  

नाना पेठेतील अल्पना थिएटरजवळील नागझरी भिंतीलगत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळाच्या नावाखाली अधिकृत पार्किग नसतानाही रिक्षा आणि दुचाकी चालकांना फसवून आणि धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या आण्णा आंदेकरसह एकावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 24 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. आंदेकर याच्यासह सागर थोपटे (रा.नाना पेठ) याच्यावर देखील गुन्हा दाखल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणींन प्रियकरावर ॲसिडने केला हल्ला

मुलींवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याच्या अनेक भयंकर घटना तुम्ही आजव ऐकल्या असतील. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात एका मुलीनंच आपल्या प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack on Lover) केला आहे. ही घटना आग्रा जिल्ह्यातील हरीपर्वत परिसरातील आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारी मुलगी आणि […]