जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अंमल सुरु असून केवळ मेडिकल दुकानाशिवाय इतर कुठल्याही आस्थापना ८ ते १५ मे या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.या आदेशाची अमंलबजावणी करण्याच्या हेतूने पंढरपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी पोलीस आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करताना दिसून येत आहेत.पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे […]
गुन्हे विश्व
पत्नीच्या मामानेच केली ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात ३ लाख ८१ हजारांची फसवणूक
पंढरपुर तालुक्यातील पुळूज येथील शेतकरी विजय मारुती गावडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजय गावडे यांच्या पत्नीचे मामा व पंढरपूर तालुक्यातील चळे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तानाजी रामचंद्र बनसोडे यांनी पंढरपूर शहरातील कॅप्टन ट्रॅक्टर्सचे शोरूम माझ्याच मालकीचे आहे असे सांगत या शोरूम मधून ट्रॅक्टर खरेदीचा आग्रह करीत वेळेवेळी रोख स्वरूपात व आरटीजीएस व ऑनलाईन स्वरूपात १९ […]
‘तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही’
वर्धा | राज्यात कोरोनाच्या संकटामुळे चिंताजनकपरिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, संपूर्ण आरोग्य यंत्रणा रोज नव्या समस्यांना सामोरे जात आहे. अशातही आरोग्य विभागातील लोकांना नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना […]
विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे, 10 मे: विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पुण्यातील माजी आमदार बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिवरकर आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह चौघांविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवरकर यांची सून 37 वर्षीय स्नेहा अभिजित शिवरकर यांनी वानवडी पोलिसांत फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी 38 […]
कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण
इंदापूर, 09 मे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका कोविड सेंटरमध्ये घुसून काही तरुणांनी तुफान राडा केला आहे. आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत, असा आरोप करत दोन तरुणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
खळबळजनक! रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून विकले!
बुलडाणा, 09 मे : राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशा परिस्थितीही पैशाच्या हव्यासापोटी काही जण काळाबाजार करत आहे. बुलडाण्यात चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाचा वॉर्ड बॉयच हा काळाबाजार […]
वांगणीतील 99 टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसात बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा दाखल
कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर नजीक असलेल्या वांगणी येथे शिला क्लिनिक ह्या खाजगी दवाखान्याच्या डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता यांनी कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करत समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची […]
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, नाशकात खळबळ
नाशिक, 08 मे : नाशिकमध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उमेश नाईक असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. […]
मास्क न वापरता कोरोनाबाधित रुग्णांवर बिनधास्त उपचार, डॉक्टरावर गुन्हा दाखल
वांगणी, 08 मे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढत आहे. पण, मुंबई जवळील बदलापूर येथील वांगणी इथं एक डॉक्टर मास्क न वापरा कोरोना रुग्णावर उपचार करत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर […]
गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण
सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी अशा घटना घडत आहे तिकडे […]











