गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आमचीच दुकाने दिसतात काय ,गावातील दारू धंदे दिसत नाहीत का ? म्हणत घातला पोलिसांशी वाद 

जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अंमल सुरु असून केवळ मेडिकल दुकानाशिवाय इतर कुठल्याही आस्थापना ८ ते १५ मे या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.या आदेशाची अमंलबजावणी करण्याच्या हेतूने पंढरपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी पोलीस आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करताना दिसून येत आहेत.पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी कारवाई साठी भाळवणी येथे गेले असता त्या ठिकाणी गवळी ट्रेडर्स व कर्मवीर कृषी केंद्र हे दोन दुकाने उघडी ठेवत ग्राहकांना वस्तूची विक्री करण्यात येत असल्याचे दिसून आले.यावेळी पोलीस कर्मचारी कारवाई करत असताना भाळवणी येथीलच दीपक गवळी हा इसम मोटारसायकल वरून त्या ठिकाणी आला व तुम्हाला आमचीच दुकाने दिसतात काय ? गावातील दारूधंदे चालू आहेत ते दिसत नाहीत का ? असा आरडाओरडा करीत या ठिकाणी उपस्थित असलेले पो.नि.भस्मे व पोलीस कर्मचाऱयांशी हुज्जत घालू लागला, कारवाई करण्यात अडथळा आणल्याने सदर इसम दीपक रावसाहेब गवळी याच्या विरोधात भा.दं. वि. क. 353, 186, 188, 269,506 प्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *