एका वकिलाने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित तयार केली. तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार देऊन विश्वासघात केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वकिलावर गुन्हा नोंदविला आहे. रियाज ताज मोहम्मद शेख (४३) रा. गणेशपेठ असे आरोपीचे नाव आहे. रियाज शेख हा स्वत:ला वकील असल्याचे सांगतो. […]
गुन्हे विश्व
एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून
पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे. या प्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर […]
बहिणीला नांदवत का नाही विचारले; संतापलेल्या भावोजीने मेव्हण्यालाच संपवले
तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या रात्री घडलेल्या हत्याकांडाने प्रचंड खळबळ उडाली आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या कारणावरून वाद झाला आणि भावोजीचा पारा चढला. भावोजीने मागेपुढे न पाहता मेहुण्या ला थेट संपवून टाकला. या हत्ये मुळे कराडसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच […]
बोकड चोरल्याच्या संशयातून मित्रानेच घेतला मित्राचा जीव
बोकड चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) येथे घडली आहे. सुरेश देवराव आत्राम (वय 42 रा.वनग्राम (चौकी) ता हिंगणा, जिल्हा नागपूर ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर अविनाश वसंतराव वासकर ( वय 35 रा, खापरी ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी अविनाश याने सुरेश याला […]
घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळं 20 वर्षांच्या नातवाकडून आजीची हत्या, वडिलांनीही दिली साथ
एका नातवानं आपल्या वडिलांच्या मदतीनं आजीचा खून केला आहे. आजीनं घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळे नातवानं हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी 20 वर्षीय नातू आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य अवघ्या वीस वर्षांच्या तरूणानं केलं आहे. दुर्दैव […]
बायकोचा जेवण वाढण्यास नकार, पतीने केला जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
जेवण वाढण्यास नकार देणाऱ्या बायकोवर दारुड्या नवऱ्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प पाच परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गंभीर अवस्थेत जखमी बहिणीला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या मेव्हण्यालाही चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप पाटील […]
कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट, चार ताब्यात, दोघे पसार
मित्राच्या वाढदिवसाचा केक चक्क कोयत्याने कापून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे सहा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या असून, अन्य दोघांनी गुंगारा देत धूम ठोकली आहे. ही घटना लातुरातील इस्लामपुरा परिसरात घडल्याचे समोर आले. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी […]
पत्नीला सोडून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव; शेजारील महिलेच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या
औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावात राहत असलेल्या एका महिलेने काही महिन्यापासून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर म्हणून खुप दिवसांपासून तगादा लावला होता. तसेच शेजारी घर असल्याने प्रत्यक्षात […]
खंडणीसाठी खास मैत्रिणीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण
नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुख्याध्यापकाचे अपहरण त्यांच्याच एका मैत्रिणीने केले. काही सहकाऱ्यांच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सूचना मिळताचं पोलिसांनी वायुवेगाने तपासाची सूत्र हलवली. त्यामुळे काही तासातचं अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाची सुखरूप सुटका झाली. कथित मैत्रिणीसह तिचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी प्रदीप मोतीरामानी हे महात्मा […]
KGF चित्रपट पाहूनच सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या
मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची हत्या करणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून हत्या करणाऱ्या सायको किलरला ताब्यात घेण्यात आले आहे. भोपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक खून करण्यात आला होता. त्याच्या तपासासाठी संशयित आरोपीला अटक करून सागरला नेण्यात आले आहे. या हत्याप्रकरणी पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती देणार […]











