गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जमिनीच्या वादातून विवाहितेसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जमिनीच्या वादातून घराला आग लावत विवाहितेसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न हल्ल्लेखोराच्या टोळीने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील वासुंद्री परिसरात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशिष पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रागाच्या भरात तरुणाने सख्ख्या भावालाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार

राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातही हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भाऊ हा संकटात मदत करणारा असतो. मात्र, पुण्यात एका भावाने आपल्या लहान भावाची हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केला. हत्येची ही घटना कात्रज-कोंढवा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी बेतली मोठ्या भावाच्या जीवावर; छातीत कोपरखळी मारून खून

लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मोठ्या भावाच्या छातीत जोराने कोपरखळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वेकडील सेंट्रल हॉस्पिटलनजीक असलेल्या ज्यूस सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुष्कर नितीन धुळे (वय २९) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शुभम […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उपाध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल; अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे कार्यकारिणीवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने 1 उपाध्यक्ष, 6 राष्ट्रीय सरचिटणीस 5 राष्ट्रीय सचिव, 6 प्रवत्ते, 12 कार्यकारिणी सदस्य, 21 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांचे प्रदेशाध्यक्ष, 9 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्याध्यापकाकडे मागितली लाच, ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच पतीला रंगेहाथ पकडले

गडचिरोली जिल्ह्यातील एका सरपंचाला 9 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 48 हजारांची लाच घेणाऱ्या चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती आणि एक सदस्य महिलेचा पती अशा सहा जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. काय संपूर्ण प्रकरण – शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लसीसाठी पैसे घेणारी पशुसंवर्धन विभागाची महिला कर्मचारी अखेर निलंबित

जनावरांना लस देण्यासाठी नागरिकांकडून पैसे आकारणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला. मेळघाटातील पिपादरी व रुईफाटा या गावी हा गैरप्रकार घडत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरुन प्रशासनाने ही कार्यवाही केली. सविता नागोराव खनखने या पशुधन पर्यवेक्षक यांनी आठ पशुपालकांकडून प्रत्येकी शंभर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सैराट चित्रपटातील आर्चीच्या भावा विरोधात पोलीस कारवाई करणार; प्रिन्सचे धक्कादायक प्रताप उघडकीस

मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केल्यानांतर या मध्ये मोठे रॅकेट असल्याचे निष्पन होत असून एका गाजलेल्या चित्रपटातील कलाकाराचा सहभाग असल्याने राहुरीचे पोलीस लवकरच प्रसिद्ध चित्रपट सैराट मधील प्रिन्स सूरज पवारच्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस प्रताप दराडे यांनी दिली आहे. सविस्तर माहिती अशी की, महेश […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गृहपाठ न केल्यामुळे शिकवणी शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या मुलीचा जाळला गाल, गुन्हा दाखल

खारघर येथे गृहपाठ न केल्यामुळे शिकवणी शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या मुलीचा गाल जाळला. या प्रकरणी कुटुंबीयांनी खारघर पोलिस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध आयपीसीच्या कलम 234 आणि बाल न्यायाच्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला मकरंद विहार येथील घरकुल सोसायटी सेक्टर 15 मध्ये असलेल्या तिच्या घरी शिकवणी वर्ग […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस उपनिरीक्षकाने PM मोदींबद्दल लिहला आक्षेपार्ह मजकूर; अनेक राजकीय नेत्यांवर पोस्ट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे. निलंबना सोबतच सूर्यवंशी विरुद्ध प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा येथे तैनात असलेला उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रसादामध्ये दिले गुंगीचे औषध; दैवी शक्ती असल्याचे भासवून तरुणीवर वारंवार बलात्कार

एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीने, आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग चार वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोवा परिसरातून समोर आला आहे. प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर कधी धमकावून, तर कधी देवीचा कोप होईल, अशी भीती दाखवून हे घृणास्पद कृत्य त्याने केले. वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून […]