पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत भिवंडीमधील एका व्यक्तीने मटण कापण्याच्या सुऱ्याने तिची हत्या केल्याची घटना घडला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, परिसरातील लोकांनी त्याचा जीव वाचवला अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. आनंद वाघमारे असे पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या […]
गुन्हे विश्व
पंढरपुरातील आगरी धर्मशाळेतून भाविकांचे लाखोंचे सोने,रोख रक्कम व मोबाईल लंपास
पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा रस्त्यावर असलेल्या आगरी समाज धर्मशाळेत भाविकाच्या रूममधून नजर चुकवून चोरटयाने ५ तोळे वजनाचे सोन्याची चैन,२ अंगठ्या,रोख रक्कम रुपये ६० हजार तसेच ओप्पो कंपनीचे २ मोबाईल व किमती घड्याळ लंपास केले आहे या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार सचिन चिंतामन माळवी वय-36जात -आग्री कोळी,धंदा-लेबर काँन्ट्रँक्टर ,रा जांभुळपाडा पोस्ट भाताने ता वसई […]
घरगुती कारणातून कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीची हत्या
यवतमाळच्या पुसद येथील विटाळा वार्डात घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून करण्यात आला. रेखा नारायण खरावे (वय ३५, रा. विटाळा वार्ड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नारायण यादवराव खरावे(वय ४०, रा. विटावा वार्ड) असे आरोपी पतीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे […]
वरात येणार तेवढ्यात… नवरीने दागिने आणि रक्कम घेऊन केला पोबारा
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक धक्कादाय घटना समोर आली आहे. लग्नाची वरात काही वेळातच मंडपात येणार होती. पण वरात येण्यापूर्वीच नवरीने पळ काढला. वरात येण्यापूर्वी नवरीने आपल्या घरातील सदस्यांच्या चहात गुंगीचे औषध टाकून तो पाजला आणि घरात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीच्या कुटुंबीयांनी […]
सभापतीचा नवराच वाळूचोर निघाला, ऐन निवडणुकीत झालेल्या कारवाईने भाजप अडचणीत
ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भाजपच्या पंचायत समितीच्या सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाल्याने गोंडपिंपरी भाजपा अडचणीत आलं आहे. रेती तस्करी करीत असताना महसूल विभागाने केलेल्या कारवाईत गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर सापडला. महसूल विभागाने केलेल्या कारवाईने भाजपच्या गोटात सन्नाटा पसरलाय. गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. रेती, मुरुमाची चोरी सुरु असताना महसूल विभागानेआज पानोरा […]
ऐन लग्न मंडपात नवरदेव हुंड्यासाठी अडून बसला
लग्नापूर्वी हुंड्याची मागणी करणाऱ्या एका नवरदेवाची भरमंडपातच धुलाई करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथली असल्याचं सांगितलं जात आहे. या नवरदेवाचं नाव मुजम्मिल हुसैन असं आहे. त्याचा निकाह 12 डिसेंबर रोजी होणार होता. त्याची वरात लग्नस्थळी पोहोचली. पण, मुजम्मिल आणि त्याचे वडील मेहमूद हुसैन या दोघांनी […]
मोलकरणीनंच चोरले 91 तोळ्याचे दागिने, सापळा रचून केली पोलिसांनी अटक
घरात एखादी चोरीची घटना घडल्यास ती चोरी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहते. घरात बाहेरून तर कोणी येऊन चोरी केली तर नसेल ना असा संशय कुटूंबातील व्यक्तींकडून केला जातॊ. मात्र, घरातील मोलकरणी हि अत्यंत विश्वासू असल्याने तिच्यावर कोणी संशय घेत नाही. पण जेव्हा तीच चोरी करते आणि तिने केलेली चोरी पकडली जाते तेव्हा चक्रावून जातात. अशीच चक्रावुन […]
अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार
व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून राजकीय नेत्याला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुर्वे हे मुंबईतील मागाठणे विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप प्रकाश सुर्वेंनी केला आहे. नेमकं काय घडलं? आमदार […]
लग्न लावून फसवणूक करणारी टोळी गजाआड, तीन महिलांसह चौघांना अटक
विवाहेच्छुक तरुणांना हेरून लग्न लावून लाखोंची फसवणूक करणाऱया इचलकरंजी येथील टोळीस राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. याबाबत राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथील विक्रम केशव जोगम (वय 24) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विक्रम जोगम यांचा विवाह 22 जून […]
जावयाचा खून करून सासऱ्याने केली आत्महत्या
मुलीला मारहाण का करतोस, का त्रास देतोस असे म्हणून सासऱ्याने जावयाचा खून केला. त्यानंतर स्वतः लॉजच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन रेणापूर नाका भागामध्ये साईधन लॉजवर खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर उमेश रमेशराव देशमुख (वय 37) रा.कातपूर याचा मृतदेह पोलीसांना […]










