गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बायकोसोबत वाद, नवऱ्याने पोटच्या लेकरांना विहिरीत ढकललं, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

कर्जत तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आरोपी बाप बचावला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो; कॉलेजसमोरील खोलीत ये, महिला येताच व्यक्तीचे धक्कादायक कृत्य

मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो, असे म्हणून एका ३३ वर्षीय विवाहितेला परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये बोलवले. त्यानंतर विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीने पतीलाच संपवले, मृत्यूचा केला बनाव

पत्नीने पतीची गळा आवळून त्याला संपविल्याची घटना टिटवाळ्याजवळील बल्याणी परिसरात घडली. प्रवीण मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रणिती मोरे असे आरोपी महिलेचे नाव असून टिटवाळा पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची कबुली प्रणिताने दिली आहे. धक्कादायक म्हणजे पतीची संपविल्यानंतर दारूमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीवर लॉजवर अत्याचार

चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचे आमीष दाखवून एका नृत्यशिक्षकाने १५ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. हा शिक्षक हडपसर काळेपडळ येथील एका डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकवत होता. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात बलात्कार व ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुशील राजेंद्र कदम (वय ३२, रा. गोपाळपट्टी, यशोप्रभा सोसायटी शेजारी, मांजरी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

रत्नागिरी जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने लांजा तालुका हादरला आहे. पत्नी व सहा वर्षांचा चिमुकल्याची हत्या पतीनेच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघड झाला. या हत्याकांडा प्रकरणी संदेश रघुनाथ चांदिवडे (संशयित) रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश याने पत्नी सोनाली (२६) हिची हत्या कोयत्याचे वार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भररस्त्यात विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, गुन्हेगाराकडून ‘व्हिक्टरी’ खूण दाखवायचा निर्लज्जपणा

शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार कल्याण पूर्व भागात घडला आहे. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोळशेवाडी पोलिसांनी त्याब्यात घेतले असून, याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कूटीवर पाठलाग केला होता. संधी मिळताच त्याने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ती दुसऱ्या मुलाला भेटली म्हणून तो चिडला अन् रस्त्यावरच केली लाथाबुक्याने मारहाण

कधी, कोणावर, प्रेम होईल सांगू शकत नाही. काही लोक तर प्रेमात आंधळे होतात. प्रेमात ते एवढे आकंठ बुडतात की ते काय करत आहेत याचंही भान त्यांना नसतं. अनेकदा तरुण तरुणींमध्ये यावरुन वाद, भांडणही होतं. काही प्रकरणे हाणामारी पर्यंत पोहोचतात. असंच एक प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलं आहे.प्रियकर तरुणानं आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत बघितलं. त्यानंतर त्यानं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा डोळा; प्रियकराच्या मदतीने साधला डाव, पण एका चुकीने फसली

‘घर का भेदी लंका ढाये’, या म्हणीला खरं ठरवत नागपुरातील एका विवाहित महिलेने प्रियकराला टीप देऊन स्वतःच्या घरात 14 लाखाची चोरी करवून घेतली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता या पत्नीला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सुमित यादव यांच्याकडे चोरी झाली. यात सोन्याच्या चांदीच्या दागिन्यासह […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

उसने पैसे न दिल्याचा राग, नवऱ्यासमोर बायकोचा विनयभंग; आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना घडल्यानंतर त्या नराधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेताच्या बांधावरच घडली धक्कादायक घटना, वाद विकोपाला गेल्यावर झाडली गोळी, बापलेकाचा गेला जीव

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादादरम्यान थेट गावठी कट्ट्याने फायरिंग करण्यात आली आली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मलगावचा पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे […]