आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे 45 वर्षीय कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या केली आहे. मृत रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. रंगारी यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
गुन्हे विश्व
जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट फेसबुक अकाउंट वरून पैशाची मागणी
अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. हे ऐकून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे.आरोपीने अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर त्या फेक अकाउंटवरून माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांच्याकडे पैशांची मागणी केली. याबाबत […]
नेमतवाडी येथे सव्वा लाखाची धाडसी चोरी
करकंब/ नेमतवाडी येथ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चंद्रकांत पवार यांच्या घरी चोरी करून सोन्या चांदीच्या दाग-दागिने व रोख रक्कम अशी सुमारे एक लाख साडे अकरा हजाराची चोरी केल्याने नेमतवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चंद्रकांत पवार हे आपली पत्नी, मुलगी व नातू यांच्यासह नेमतवाडी येथे राहतात त्यांची दोन्ही […]
भरदिवसा बांधकाम ठेकेदारावर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद
पुणे – वारजे भागात एका बांधकाम ठेकेदारावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. बांधकाम ठेकेदार पळाल्याने बचावला. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हल्लेखोर सीसीटिव्हीत टिपले गेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. रवींद्र सखाराम तागुंदे (36 […]
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य
स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्यावर वाशिम पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षकावर त्यांच्याच खात्यातील महिला पोलीस […]
तलवारीने बर्थडेचा केक ‘तो’ कापत होता अन् झालं असं काही की..
मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना, तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयच्या चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी एंट्री करत बर्थडे बॉयला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेटजवळ रात्री उशिरा वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. याआधारे शहर पोलीस घटनास्थळी धडकले […]
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांस लाच घेताना अटक, मात्र पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने रक्कम अज्ञातस्थळी फेकली
माण तालुक्यातील दहिवडी येथील वनविभाग कर्मचाऱ्यांस केलेल्या कामाचे चेक ठेकेदारांस काढून देण्यापोटी लाच घेताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. वन विभागातील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) असे लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची […]
सासू-सुनेचा वाद विकोपाला; विळ्याने गळा कापून सासूची हत्या
सासू आणि सुनेत वाद होतच असतात मात्र, जळगाव जिल्ह्यात अशी एक घटना उघडकीस आली आहे ज्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला आहे. सुनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक बुधवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गजानन महाराज नगर भागात सुनेने सासूच्या डोक्यात आणि पाठीवर विळा मारला. […]
मित्राचा खून करून आरोपी पोलिसांसमोर हजर
पुणे – मध्यरात्री मद्यप्राशन करताना मित्रांमध्ये वाद झाले. यातून एकाने दुसऱ्याचा खून केला. यानंतर आरोपी दोन दिवस मद्यप्राशन करत होता. तिसऱ्या दिवशी तो खून झालेल्या ठिकाणी गेला. मात्र, रखवालदाराने हटकल्याने त्याने पोलीस स्टेशन गाठत खुनाची कबुली दिली. राजन रमेश सहानी (27, रा. वारजे नाका) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा […]
पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त
पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे यांची जुलै 2016 मध्ये दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामुळे पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. तीन पिस्तूल आणि […]











