गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट फेसबुक अकाउंट वरून पैशाची मागणी 

अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. हे ऐकून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे.आरोपीने अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर त्या फेक अकाउंटवरून माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांच्याकडे पैशांची मागणी केली. याबाबत अखिलेश हातवळणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट बनवून त्याद्वारे पैशांची मागणी करण्यात येत आहे. यासाठी बनावट अकाउंटधारक मॅसेंजरवर चॅटींग करून फसवणूक करीत असल्याचे लक्षात आलं आहे. आरोपी गुगल पे अकाउंटद्वारे पैशांची मागणी करतो. पैशांची अर्जंट गरज असून 12 हजार रुपये द्या, असं आरोपी सांगतो. आरोपी यासाठी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी गुगल अकाउंटचा दिला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *