ताज्याघडामोडी

तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द

गुंठेवारीच्या दस्त नोंदणीस परवानगीची शक्यता जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे. तीन गुंठ्यांची अट त्यामुळे असणार नाही. कारण तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. आता 1-2 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रस्त्याच्या किनाऱ्यावर वडिलांचा मृतदेह ठेवून 7 मुलांमध्ये मारहाण; अंत्यदर्शनापूर्वीच तिघे रुग्णालयात

हरयाणातील नरियाला गावात बुधवारी खळबळ उडाली. 85 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूनंतर 7 मुलांची मारामारी झाली. मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाताना तीन वेळा मुलांमध्ये मारहाण झाली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत ज्येष्ठ व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्याप कोणत्याही पक्षाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. या मारहाणीत तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात […]

ताज्याघडामोडी

कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार; शहांचे मोठं विधान

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे विधान केले असून, कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले असून त्यावेळी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, […]

ताज्याघडामोडी

हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला; भयानक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एक भयानक घटना घडली आहे. एका कारखान्यामध्ये हवा भरताना जेसीबीचा टायरचा स्फोट होतो. या अपघातामध्ये हवा भरण्याचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 3 मे रोजीदुपारी तीन वाजून 50 मिनिटांनी हा अपघात झाला असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रायपूरच्या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या सिलातारा फेस-2 मध्ये हा अपघात […]

ताज्याघडामोडी

‘विठ्ठल’ ची निवडणूक स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून लढण्याचा कल्याण काळे समर्थकांचा आग्रह

भगीरथ भालकेंना द्यावी लागणार एकाकी झुंज ? श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये काळे गटाने स्वतंत्र निवडणुक लढवावी अशी अग्रही मागणी कार्यकर्त्यांनी कल्याणराव काळे यांचेकडे केली. येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या सभागृहात काल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये ही मागणी करण्यात आली. सध्या पंढरपूर तालुक्यात श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे  वातावरण तापु लागले […]

ताज्याघडामोडी

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना ‘क्लीन चिट’

कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याप्रकरणात या सर्व गुन्ह्यांतून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी आयोगाला याबाबतची माहिती दिली. दरम्यान, भिडे यांचे वकील ऍड. पुष्कर दुर्गे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच मनसुख हिरेन हत्येतील मुख्य आरोपी- NIA

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतीच्या वादामुळे मुलांच्या भांडणाला कंटाळू आई- वडिलांनी संपवले जीवन

शेती व संपत्तीचा भावा-भावातील वाद हा सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र या वादामुळे जन्मदात्या आई-वडिलांची काय अवस्था होत असते, याकडे कोणी लक्ष देत नाहीत. काबाडकष्ट करून जपलेली शेती व संपत्ती व त्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली मुले यामुळे कोंडीत सापडलेल्या खंडाळा येथील वृद्ध दाम्पत्याने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मुलांच्या शेतीचा वाद कधीतरी थांबेल; परंतु […]

ताज्याघडामोडी

‘आता तेच राहिले नाही तर मी जगून काय करू’, म्हणत पतीच्या मृत्यूच्या एका तासांनंतर पत्नीची आत्महत्या

मध्य प्रदेशातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे डॉक्टर पतीच्या मृत्यूच्या एका तासानंतर असिस्टंट प्रोफेसर असलेल्या पत्नीने आत्महत्या केली. चूना भट्टी भागात राहणारे ४७ वर्षीय डॉक्टर पराग पाठक भाभा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. २८ एप्रिलला सकाळी ९ वाजता डॉक्टर पाठकची तब्येत अचानक बिघडली. पत्नी प्रीति झारिया यांनी पतीला पाणी पाजलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हनीमूननंतर पावणेचार लाख घेऊन नववधू फरार, लोणी पोलिसांत गुन्हा दाखल

मराठवाडय़ातून आलेल्या एका तरुणीने बाभळेश्वर येथील तरुणाशी लग्नही केले, हनीमूनही केला आणि विश्वास संपादन करून तीन लाख 70 हजार रुपये घेऊन पोबाराही केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.याप्रकरणी लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण मामाकडे राहून मोलमजुरीचे काम करायचा. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने गावागावात अनेक अविवाहित तरुण दिसत आहेत. संबंधित तरुणाला […]