ताज्याघडामोडी

कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार; शहांचे मोठं विधान

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे विधान केले असून, कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले असून त्यावेळी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ममतांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे ममता दीदींनी असा विचार करू नये की, भाजप पलटवार करणार नाही.

तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की, नागरिकत्व कायदा कधीही अस्तित्वात येणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कोविड महामारी संपल्यावर आम्ही CAA लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल असे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे मोदी सरकारचे मूळ लक्ष्य असून, आम्ही आमच्या सैनिकांना सीमेवरील सुरक्षेसाठी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत. आज सतलज, कावेरी आणि नर्मदा फ्लोटिंग बीओपी राष्ट्राला समर्पित असल्याचेही यावेळी शहा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *