ताज्याघडामोडी

डोळ्यासमोर बुडत होता तरूण…गोताखोर करत राहिले पैशाची मागणी; अखेर ‘त्याने’ गमावला जीव

फारुखाबाद जिल्ह्यातील पांचाळ घाटावर गंगेच्या काठावर रविवारी सायंकाळी भागवत कथेच्या साहित्याचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या इटावा जिल्ह्यातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ज्यावेळी हा तरुण बुडत होता. त्यावेळी घाटावर उपस्थित असलेल्या गोताखोरांकडे मदतीची याचना केली होती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गोताखोर दहा हजार रुपयांची मागणी करत होते. कसे तरी पैसे जमा केले, तोपर्यंत खूप उशीर […]

ताज्याघडामोडी

‘फडणवीसांना कायम या पदावर बघायला आवडेल’, भुजबळांची मनापासून इच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम नांदेडमध्ये पार पडला. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सध्याचं राजकारण, शिवसेनेचा वाद, शिवसेना सोडण्याचं कारण तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत स्पष्टपणे उत्तरं दिली. देवेंद्र फडणवीस यांना नेहमी विरोधी पक्षनेते म्हणून बघायला आवडेल ते विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम करतात, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. देवेंद्र […]

ताज्याघडामोडी

पोलिसांच्या नावाने लाच मागितली, काँग्रेस आमदाराचा नातेवाईक अटकेत

राज्यात गुन्ह्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. गुन्हे करणाऱ्या आरोपींना पोलीस तात्काळ अटक करून त्यांची रवानगी तुरुंगातही करत असतात. यातील काही गुन्हेगार नवखे असतात तर काही सराईत असतात. त्यामुळे पोलीस गुन्हा आणि गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहूनच कारवाई करत असतात. पण पुण्यात एक वेगळाच आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. थेट पोलिसांच्या नावानेच लाच मागितल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार आमच्याकडे येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानात मोठी सभा होणार आहे. शिंदे गटाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी ही सभा आयोजित केली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याच मैदानावर जाहीर सभा झाली होती. आता याच मैदानावरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आईचा शिडीवरून पडून मृत्यू, नंतर घाबरून शरीराचे तुकडे; लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट…

लालबाग हत्याकांडामध्ये आता आरोपी रिंपलने पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती दिली आहे. अखेर तिने आईची हत्या का केली? याचा खुलासा तिने पोलिसांसमोर केला आहे. आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ५ तुकडे करणाऱ्या रिंपल जैनने मुंबई पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. काहीही कारण नसताना आई वारंवार टोकायची. यामुळे ती अस्वस्थ झाली होती. अशात दुसरीकडे, […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुन्हा पाऊस थैमान घालणार, हवामान खात्याकडून हाय अलर्ट

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस होत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात […]

ताज्याघडामोडी

शिक्षकाने विदयार्थीनीला तुला पुस्तके, पेन, कलर देतो म्हणत घरी नेले अन…

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने क्लासमधील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची निंदनीय घटना शहरातील देवपूर भागात घडली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.त्याला अटकही करण्यात आली.  इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षीय मुलगी संशयित परेश दत्तात्रय सोनवणे (वय ४९, रा. शिवाजी नगर, वाडीभोकर रोड, धुळे) याच्याकडे क्लाससाठी जायची. नेहमीप्रमाणे २ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास ती शिकवणीसाठी […]

ताज्याघडामोडी

३ लाखाची लाच, आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेस प्रदेश महासचिवाला अटक

पोलिसांच्या नावाने तीन लाखाची मागणी करणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यात आणखी धक्कादायक म्हणजे तीन लाखाची मागणी करणारे हे दोघे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना आता सुरू झाल्या आहेत. अक्षय सुभाष मारणे आणि गणेश […]

ताज्याघडामोडी

शेतात काम करत होता, अचानक वीज कोसळली अन् क्षणात होत्याचं नव्हतं…

शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द गावामध्ये घडली असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात वीज पडून अजून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच दोन बैलाच्या अंगावर वीज पडून त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव […]

ताज्याघडामोडी

सरकार पडण्याच्या भीतीनंच मंत्रालयात लगबग; महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठं भाष्य केलं आहे.राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच लागणार आहे. या निकालानंतर सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु झाली, असल्याचा मोठा दावा नाना पटोले यांनी केला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल, यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत […]