गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केलं; पण विवाहानंतर 18 दिवसातच नवरीने दाखवला खरा रंग

एक लग्नाची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील सामान घेऊन फरार झालेल्या नवरीबाईसह एका महिला दलालाला राजस्थानच्या जालोर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, भीनमाळच्या माघ कॉलनीत राहणारा अभिषेक उर्फ ​​धरमचंद जैन याने सीता गुप्ता नावाच्या महिलेशी पूर्ण रितीरिवाजाने लग्न केलं होतं. स्वरूपगंजमध्ये राहणाऱ्या मनीषा सेनच्या मध्यस्तरीनंतर हा विवाह झाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बिअर साठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांनी पोटात खुपसली बिअरची बॉटल

बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून 2 मित्रांनी त्यांच्या मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील बरसा मुंडा चौकातील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही मित्र बिअर पीत बसले होते. मात्र अजून बिअर पिण्यासाठी आरोपींनी शाहरुख पठाण या मित्राकडे पैसे मागितले. मात्र […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाई न म्हटल्याने तरुणाला बेल्टने केली बेदम मारहाण, जमिनीवर फेकलेली बिस्किटे खाण्यासही भाग पाडले

भाई (डॉन) न म्हटल्याने एका कुख्यात गुन्हेगारासह चौघांनी एका तरुणाला बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी पीडिताला जमिनीवर फेकलेली बिस्किटे तोंडाने उचलून खाण्यास भाग पाडले. ही हृदयद्रावक घटना पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील गणेशनगर भागातील आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच रोहन वाघमारे, प्रशांत आठवडे, आदित्य काटे आणि प्रेम शिंदे यांच्यावर […]

ताज्याघडामोडी

नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश!

राष्ट्रवादी काँग्रेचे शिरुरमधील खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली. शिवाय, या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला गेला. तर, अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नववीत शिकणाऱ्या २ विद्यार्थिनींची आत्महत्या

सातारा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. यातील एका विद्यार्थिनीने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्येमागील धक्कादायक कारण उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शाहुपुरी येथे नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ म्हणून तिने हे […]

ताज्याघडामोडी

टीईटी घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; आयएएस अधिकाऱ्याला अटक

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी (टीईटी) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीईटी घोटाळाप्रकरणी कृषी विभागातील आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला टीईटी घोटाळा प्रकरणी ठाण्यातून अटक केली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी २०१९-२०वर्षीचा टीईटी घोटाळा उघडकीस केला […]

ताज्याघडामोडी

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

भाजपा नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नातीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या पेशाने डॉक्टर होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ती आपला पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत राहत होती. सौंदर्याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तिच्यासोबत तिच्यासोबत काम करणारे एक डॉक्टरही राहत असल्याचं जनसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटलं […]

ताज्याघडामोडी

आता मिळणार 30 दिवसांची रिचार्ज व्हॅलिडीटी, ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे फोन वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा फायदा होणार आहे. ट्रायने Telecom Tariff Order, 2022 अंतर्गत घेतलेले नवीन निर्णय घेतले असून दूरसंचार कंपन्यांना आदेशही जारी केले आहेत.  या आदेशानुसार आता टेलिकॉम कंपन्यांना 28 नाही तर 30 दिवसांची रिचार्ज व्हॅलिडीटी ग्राहकांना द्यावी लागणार आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या […]

ताज्याघडामोडी

अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे

सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केलाय. सक्तवसुली संचलनालयाने (ED) मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना मागील वर्षी ७ डिसेंबरला सिताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला. यात कुंटे यांनी पोलीस विभागाच्या बदलीबाबत ही माहिती दिलीय. सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या माहितीनुसार, “अनिल […]

ताज्याघडामोडी

नवऱ्याने फेकली नवरीवर वरमाला, संतापलेल्या नवरीचा लग्नाला नकार

उत्तर प्रदेशमधील औरिया जिल्ह्यात एका लग्नादरम्यान विचित्र प्रकार घडला. नवऱ्याने वरमाला नवरीवर फेकल्याने संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले आहे. कुटुंबीयांनी नवरीला समजवायचा बराच प्रयत्न केला मात्र ती लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. औरिया जिल्ह्यातील नवीन बस्ती भागात आकाश व रसिका (नवरीचे नाव बदलले आहे) यांचे लग्न होणार होते. लग्नाच्या विधी सुरू असताना आकाशने मस्करीत रसिकावर […]