कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नव्हती. परंतु, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला साताऱ्यात सुरुवात झाली. त्यानंतर आपल्या समोरील पैलवानांचा पराभव करत विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील अंतिम लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, आता कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल हाती आला आहे. 64 […]
ताज्याघडामोडी
कोरोना प्रतिबंधक लसींच्या किंमतीत मोठी घट, आता एवढ्या रुपयांना मिळणार लस
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने शनिवारी कोविशील्ड या आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या किंमतीत निम्याहून अधिक कपात केली आहे. त्यानुसार, आता खासगी रुग्णालयात या लसीचा एक डोस 600 ऐवजी अवघ्या 225 रुपयांना मिळेल. देशातील सर्वच प्रौढ नागरिकांना बुस्टर डोस देण्याची घोषणा केंद्राने शुक्रवारी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोव्हिशिल्डच्या […]
मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या बाप-लेकावर गुन्हा दाखल
वीज वापराची नोंद वीजमीटरमध्ये कमी प्रमाणात होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून 71 हजार 420 रुपये किमतीची वीजचोरी केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय नरसिंह चिंतामणी व पंकज दत्तात्रय चिंतामणी (दोघे रा. सिद्धिविनायक सोसायटी, सावेडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत (रा. रासणेनगर, […]
औरंगाबादच्या कीर्तनकार बाबाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे किर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून याच्या दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. या व्हिडिओनंतर इतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली […]
पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव, महिलेस अटक
कौटुंबिक वादातून पतीचा खून करून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे. रमेश भिसे (वय 44, रा. लांडगे निवास, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी नंदिनी रमेश भिसे (वय 40) हिला अटक करण्यात आली आहे. रमेश भिसे आणि त्याची […]
घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आज दुपारच्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थाना बाहेर जमा झाले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या आंदोलनानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार म्हणाले, मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी […]
नमामी चंद्रभागा विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक – आ. समाधान आवताडे
भारताची दक्षिण काशी म्हणून लौकिक असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक पंढरीत दाखल होतात. सांप्रदायिक आणि अध्यात्मिक राजधानी असणाऱ्या पंढरपूर मध्ये येणारा वैष्णवांचा मेळा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जमा होतात.पंढरपूर नगरीच्या जलतीर्थ आख्यायिकेची परंपरा जतन करणारी चंद्रभागा नदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य यांच्या कचाट्यात सापडली असल्याचे दिसून येत आहे. वारकरी भक्तांच्या […]
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली वापरण्यास महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सुरुवात केली. सध्या अनेक मॅन्युअल हस्तक्षेपाचा जात प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये समावेश असल्यामुळे फसवणूक आणि बनावटगिरी होण्याची अनेक उदाहरणे समोर आली होती, पण या सर्व गोष्टींवर आता चाप लागणार असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्लॉकचेनवर आधारित जात प्रमाणपत्रे महाराष्ट्राच्या काही भागात देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ब्लॉकचेन-आधारित […]
पाण्याचा जार घेण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग
आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत तरुणीला झाऱ्याचे चटके देऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात पीडित तरुणी दोन मैत्रिणीसह राहते. ही तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत […]
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
३१ जानेवारीपासून संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. तर त्यासोबत देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार हे अधिवेशन उद्या म्हणजेच शुक्रवार, ८ एप्रिल पर्यंत अधिवेशन चालणार होते. पण आज म्हणजेच गुरुवार, ७ एप्रिल रोजी हे अधिवेशन अनिश्चित काळापर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर लोकसभेचे […]











