ताज्याघडामोडी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नव्हती. परंतु, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला साताऱ्यात सुरुवात झाली.

त्यानंतर आपल्या समोरील पैलवानांचा पराभव करत विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील अंतिम लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, आता कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल हाती आला आहे.

64 वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरला चिटपत केले आहे. पृथ्वीराजने विशाल बनकरचा स्पर्धेत 5-4 अशा गुणांनी पराभव केला आहे.

या कुस्ती स्पर्धेत 86 ते 125 किलो वजनी गटाच्या गादी आणि माती विभागातील अंतिम फेरीत विजयी झालेले मल्ल एकमेकांविरोधात लढणार होते. अंतिम सामन्यात पोहचलेले पृथ्वीराज आणि विशाल दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झालेले मल्ल आहेत.

मात्र, विशाल मुंबईचे तर, पृथ्वीराज कोल्हापूरचे नेतृत्व करत होता. अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये सुरुवातील विशालने आघाडी घेत 4-3 अशी आघाडी घेतली होती. पण, पृथ्वीराजने विशालवर मात करुन 5-4 असे गुण मिळवत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *