ताज्याघडामोडी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

३१ जानेवारीपासून संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. तर त्यासोबत देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.

ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार हे अधिवेशन उद्या म्हणजेच शुक्रवार, ८ एप्रिल पर्यंत अधिवेशन चालणार होते. पण आज म्हणजेच गुरुवार, ७ एप्रिल रोजी हे अधिवेशन अनिश्चित काळापर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीचं आमंत्रण दिले होते. सभागृहाची गरिमा वाढवण्यासाठी आणि चर्चा संवाद यांचा स्तर उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सर्व पक्षांनी सक्रिय सहकार्य देण्याची गरज असल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलून दाखवल्या.

याच आमंत्रणानुसार काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी या पंतप्रधान मोदी यांना भेटल्या आहेत. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली किंवा ही भेट किती वेळ चालली याबाबत कोणताही अधिकचा तपशील समोर आला नाही. ओम बिर्ला यांनी या भेटीचे तसेच इतर पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *